कदम, ज्योत्स्ना संभाजी

Kadam, Jyotsna Sambhaji

कदम, ज्योत्स्ना

<!–
चित्रकार
पत्ता : सी.वन्. १२/७, श्रीरंग सोसायटी, ठाणे
कार्यक्षेत्र : फाइन आर्टिस्ट, व्यावसायिक चित्रकार व लेखिका
दरध्वनी : २५३९३८३१ – भ्रमणध्वनी : ९९६९२७०६०४
–>

चित्रकार ज्योत्स्ना संभाजी कदम या ठाण्याच्या चित्रकला क्षेत्रातील एक प्रसिद्ध नाव. व्यावसायिक चित्रकार व लेखिका म्हणून प्रसिद्ध असणार्‍या ज्योत्स्ना कदम या गेली ३० वर्षे सातत्याने पेंटींग करत आहेत. एक दर्जेदार, सर्जनशील, मनस्वी चित्रकार म्हणून त्यांची कलाक्षेत्रात ख्याती आहे. मुंबईच्या जहांगीर आर्ट गॅलरीत तसेच आर्टिस्ट सेंटर, नेहरु सेंटर अशा अनेक गॅलरींमध्ये त्यांची अनेक चित्र प्रदर्शने झाली आहेत.

चित्रकलेबरोबर लेखनातही त्यांना रस आहे. अनेक वर्तमानपत्रांतून तसेच मौज, ऋतुरंग यांसारख्या दर्जेदार दिवाळी अंकांतून त्यांनी ललित लेखनही केले आहे. इंग्रजी माध्यमाच्या इयत्ता १० वीच्या पाठ्यपुस्तकात “बदलापूरचे घट” हा धडा समाविष्ट झाला आहे. त्यांनी विविध कोशांमध्येही केले आहे. त्यांनी “सर आणि मी” हे आत्मचरित्रही लिहिले आहे. याशिवाय त्या अनेक ठिकाणी चित्रांची प्रात्यक्षिके तसेच कला रसास्वाद या विषयावर व्याख्यानेही देतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*