देशपांडे, गौरी

जन्म-फेब्रुवारी ११, १९४२
मृत्यू- मार्च १, २००३

गौरी देशपांडे या लेखिका होत्या. कथा, कादंबरी, ललित लेख, स्पुट लेखन, ललितेतर लेखन, भाषांतर, कविता, संशोधन यासारखे बहुतांशी सगळे साहित्यप्रकार गौरी देशपांडे यांनी हाताळले आहेत. मराठीबरोबरच त्यांचे बरेचसे इंग्रजी लिखाण तसेच काही इंग्रजी -मराठी व मराठी- इंग्रजी अनुवादसुद्धा प्रकाशित झाले आहेत.
प्रसिद्ध लेखिका, संशोधक इरावती कर्वे या गौरी देशपांडे यांच्या मातोश्री होत. दिनकर उर्फ डी. डी. कर्वे हे त्यांचे वडिल होत. जाई निंबकर या मराठीतील लेखिका त्यांच्या थोरल्या भगिनी. प्रसिद्ध समाजसुधारक व स्त्री-स्वातंत्राचे जनक महर्षी धोंडो केशव कर्वे हे डी. डी. कर्वे यांचे वडिल व गौरी देशपांडे यांचे आजोबा होते.’समाजस्वास्थ्य’ या लैंगिक शिक्षण देणार्‍या स्वातंत्र्यपूर्व काळातील मासिकाचे संपादक र. धों. कर्वे हे गौरी देशपांडे यांचे सख्खे चुलते.
गौरी देशपांडे यांचे पुण्यातच प्रामुख्याने वास्तव्य राहिले आहे. काही काळ मुंबई, बर्‍याचशा परदेशवार्‍या व विंचुर्णी, तालुका- फलटण येथेही त्यांचे वास्तव्य होते.
गौरी देशपांडे यांचे प्रकाशित साहित्य गौरी देशपांडे यांच्या साहित्याची सविस्तर सुची विद्या बाळ, गीताली वि. म., वंदना भागवत संपादित, मौज प्रकाशन गृह प्रकाशित कथा गौरीची या पुस्तकात वाचावयास मिळते. ‘Beetween Births’ या १९६८ साली प्रकाशित झालेल्या इंग्रजी काव्य संग्रहाने त्यांचा लेखनप्रवास सुरु झालेला दिसतो. त्यांचे देहावसन होईस्तोवर त्या लिहित होत्या. सन २००३ मधील लेखनाचेही संदर्भ त्यांच्या साहित्य-सुचीत आढळतात.
त्यंचे काही गाजलेले व उल्लेखनीय साहित्य …
मराठी पुस्तके
१. एकेक पान गळावया
२. तेरुओ आणि कांही दूरपर्यंत
३. निरगाठी’ आणि ‘चंद्रिके ग, सारिके ग!’
४. ‘दुस्तर हा घाट’ आणि ’थांग’
५. आहे हे असं आहे
६. मुक्काम
७. विंचुर्णी धडे
८. गोफ
९. उत्खनन

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*