राजे, (डॉ.) श्रीकांत कमलाकांत

Raje, (Dr) Shrikant Kamalakant

डॉ. श्रीकांत राजे हे ठाणे येथील सुप्रसिद्ध रेडिओलॉजिस्ट – क्ष-किरण तज्ज्ञ (Radiologist) आहेत. ते गेली सुमारे २० वर्षे या व्यवसायात आहेत. ठाणे येथे `मेडिव्हिजन’ या नावाने त्यांचे अत्यंत सुसज्ज डायग्नोस्टिक सेंटर आहे. या सेंटरच्या ठाण्याव्यतिरिक्त मुंब्रा, डोंबिवली तसेच तळेगाव येथेही त्यांच्या शाखा आहेत.

डॉ. राजे यांचा जन्म ३ ऑगस्ट १९६३ रोजी झाला. त्यांचे शालेय शिक्षण मो.ह.विद्यालय, ठाणे येथे तर महाविद्यालयीन शिक्षण रुईया महाविद्यालयात झाले. त्यानंतर वैद्यकीय शिक्षण ग्रॅंट मेडिकल कॉलेजमधून झाले.

“मेडिकल इमेजिंग” या क्ष किरण व मॉडर्न इमेजिंग विषयांवरील पहिल्या मराठी पुस्तकाचे ते लेखक आहेत. सर्वसाधारण माणसाला या विषयावरील महत्वाची माहिती थोडक्यात मिळण्यासाठी या पुस्तकाचा मोठा उपयोग झाला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*