केळुसकर, (डॉ.) महेश वासुदेव

मराठी साहित्यक्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले कवी डॉ. महेश वासुदेव केळूसकर हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. मुळचे सिंधुदुर्गचे असणारे केळूसकर ठाण्यातील साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात ग्रंथालय चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत.

एम.ए.पी.एच.डी. पर्यंतचे शिक्षण घेतलेले आणि आकाशवाणीवर कार्यक्रम अधिकारी म्हणून काम करणारे केळूसकर आपल्या साहित्याने, लेखनाने वाचकांच्या मनात घर करुन बसले आहेत. आतापर्यंत त्यांचे बहुविध साहित्य प्रकारांतील लेख प्रकाशित झाले आहे. ज्यात “मोर” (१९८६), “पहारा” (१९९६), “झिनझिनाट” (१९९७) हे कवितासंग्रह, “रोझ डे” व “मी (आणि) माझा बेंडबाजा” हे युवा कविता लेख, “डोंगर चालू लागला” हा बालकथासंग्रह, “साष-टांग नमस्कार” (२०००) ही विनोदी गद्य पत्रे, “कमलबंदी” (२००२) हे आस्वाद समीक्षा लेखन तसेच “यु कॅन ऑल्सो विन” व “क्रमश:” या कादंबरींचा समावेश होतो. या सर्व पुरस्कारांव्यतिरिक्त कवी महेश केळूसकर यांनी अनेक सन्मान मिळवले आहेत. फेब्रुवारी १९९१ मध्ये गोमांतक मराठी अकादमी आयोजित केलेल्या पाचवे मराठी साहित्य परिषदेचे माजी कार्याध्यक्ष आहेत. कोकण कला अकादमीचे ते सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष आहेत. को.म.सा.प. च्या “झ पूर्झा” या मुखपत्राचे संपादक म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

मनातील ठाणे :

खरं तर हा माझा परिचय आणि माझ्या साहित्य प्रवासाची ओळख मनाला सुखावह वाटत असला तरी मी मझ्यात रमण्यापेक्षा मी सतत मला आवडणार्‍या शहरांमध्ये, उपनगरामध्ये रमतो. खेड्यांना वनराईने विळखा घातला असेल तर अधिकच रमतो. अलिकडच्या काळात ठाणे शहर त्या शहराचा झपाट्याने होत असलेला विकास, तलावांचे सुशोभिकरण, रंगायतन नाट्यगृहाने टाकलेली कात हे पाहताना खरोखरच मन सुखावून जातं. माझं कवी मन या सांस्कृतिक उपरा
धानीच्या भोवती पिंगा घालतं. त्याचं कारण इथली वनराई, उपवनचा अप्रतिम निसर्ग आणि कलावंतांना मिळत असलेला सन्मान या दोन टोकाच्या गोष्टी मला सरळ आणि तरल वाटतात. वृक्षवेलींवर फुलांनी झोका घ्यावं आणि ठाणेकरांनी सिमेंटच्या रस्त्यावरुन व उड्डाणपुलावरुन वायुवेगे सफर करावी. खरच मी या ठाणे शहराच्या प्रेमात पडलो आहे.

पुरस्कार : “मालवणी” प्रयोगात्म लोककला या त्यांच्या पी.एच.डी. संशोधनासाठी त्यांना मुंबई विद्यापीठाचा कै. अ. का. प्रिथोळकर पुरस्कार, पद्मश्री भाऊसाहेब वर्तक पुरस्कार इत्यादी पुरस्कार मिळाले आहेत. “झिनझिनाट” या त्यांच्या कवितासंग्रहाला यशवंतराव चव्हाण सांस्कृतिक प्रतिष्ठान पुणे, हा पुरस्कार १९९८ साली मिळाला होता. “साष-टांग नमस्कार” या विनोदी लेखनासाठी त्यांना उत्कृष्ट वाडम़य राज्य पुरस्कार तसेच म.सा.प. पुणेचा चि. वि. जोशी पुरस्कार मिळाला आहे.

<!–

– कवी

गाव : फोंडाघाट, ता. कणकवली, सिंधुदुर्ग

पत्ता : २०३, रामेश्वर को. ऑप. हौ. सोसायटी, धोबी आळी,

मुंदडा कंपाऊंड, ठाणे (प.) ४००६०१

कार्यक्षेत्र : साहित्य आणि सांस्कृतिक / आकाशवाणी

भ्रमणध्वनी : ९८६९४८६७७१

ई-मेल : maheshkeluskar@gmail.com

–>

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*