टेपे, (डॉ.) दीपक

Tepe, (Dr.) Deepak

दिल्लीच्या मौलाना आझाद मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता व्हायला आवडेल, की जि.बी. पंत हॉस्पिटलचे संचालक? अशी विचारणा जागतिक कीर्तीचे कार्डियाक अॅनेस्थेटिस्ट डॉ. दीपक टेपे यांना केंद्र सरकरकडून अनौपचारिकपणे करण्यात आली.तेव्हा त्यांनी “मौलाना आझाद” च्या अधिष्ठाता पदाची निवड केली. कारण देशातील पहिल्या पाच अव्वल मेडिकल कॉलेजांत समावेश असलेल्या “मौलाना आझाद” चे अधिष्ठातापद सांभाळण्याचे आव्हान मोठे होते.पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांशी येणारा संपर्क आणि शिक्षण क्षेत्रात योगदानाची संधी त्यात दडली होती. या कॉलेजचे अधिष्ठाता होणारे डॉ.टेपे पहिले मराठीच नव्हे तर पहिले भूलतज्ज्ञही ठरले.

महाराष्ट्र टाईम्सच्या मराठी मुद्रा या सदरात आलेला डॉ. दीपक टेपे यांच्यावरील लेख पुढील पानावर वाचा…

दिल्लीला महाराष्ट्राची भूल!

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*