कालेलकर, दत्तात्रय बाळकृष्ण

काकासाहेब कालेलकर

जन्म – १ डिसेंबर १८८५ ,
मृत्यू – २१ ऑगस्ट १९८१

दत्तात्रेय बाळकृष्ण कालेलकर, उर्फ आचार्य कालेलकर उर्फ काकासाहेब कालेलकर; हे थोर स्वातंत्र्यसैनिक, समाज सुधारक, इतिहासकर, शिक्षण तज्ञ, पत्रकार, साहित्यिक तसंच भारतीय संस्कृतीचे गाढे अभ्यासक तथा गांधीवादी म्हणून परिचित आहे.

काकासाहेब कालेलकरांचा जन्म १ डिसेंबर १८८५ साली सावंतवाडीच्या बेलगुंडी या गावी झाला.फर्ग्युसन महाविद्यालयातुन शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ त्यांनी “राष्ट्रमत” या दैनिकात संपादकीय विभागात काम केलं. त्यानंतर बडोदा येथील गंगाधर विद्यालयात कालेलकर शिक्षक म्हणून रुजू झाले, पण “या विद्यालयात सरकार विरोधी कारवाया चालतात” असे कारण दाखवून ब्रिटीश सरकारने हे विद्यालय बळजबरीने बंद केले.

“गंगाधर विद्यालय” बंद झाल्यावर काकासाहेबांनी महात्मा गांधीजींच्या गुजराथ येथील साबरमती आश्रमाचे सदस्य झाले. तिथे असतानाच त्यांनी “सर्वोदय” या महात्मा गांधीजींच्या नियतकालिकाचे संपादक म्हणून काम पाहिलं.

हिंदी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी मोलाचं योगदान बजावलं, त्यासाठी हिंदुस्थानी प्रचार सभेच्या कामात सक्रीय सहभाग नोंदवला. भारत देशाचं ऐक्य टिकून रहाण्यासाठी हिंदी भाषेच्या प्रचाराची नितांत आवशक्यता असल्याचं ते मानत, त्यासाठी त्यांनी भारतभर भ्रमण ही केले.

महात्मा गांधीजींच्या प्रेरणेमुळे साकारलेल्या गुजराथ विद्यापिठाच्या स्थापनेत काकासाहेब कालेलकरांनी महत्वाची भूमिका पार पाडली. काही काळ कालेलकर गुजराथ विद्यापीठाचे कुलगुरु ही होते.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर सहा वर्षांनी, म्हणजे १९५३ साली “मागास वर्गीय आयोग” नेमण्यात आला होता, काकासाहेब कालेलकर या आयोगाचे अध्यक्ष होते. १९५५ ला या आयोगाने आपला अहवाल सरकारला केला. या अहवालात दलित तसंच अस्पृश्यांसाठी अनेक कल्याणकारी योजनांची शिफारस करण्यात आली होती.

काकासाहेब कालेलकरांनी मराठी, इंग्रजी, हिंदी आणि गुजराती जनतेने सुद्धा त्यांच्यावर भरभरुन प्रेम केले, कालेलकरांना गुजराती लोकं आदराने “सवाई गुजराती” म्हणत असत.

काकासाहेब कालेलकरांनी लेखन आणि शिक्षण क्षेत्रासाठी केलेल्या भरीव कामगिरीबद्दल भारत सरकारने १९६४ साली पद्मविभूषण पुरस्कार देऊन गौरविले, तर कालेलकरांच्या साहित्य क्षेत्रातील अतुलनीय कामासाठी १९६६ साली “जीवन व्यवस्था” या गुजराती भाषेतील निबंध संग्रह साठी साहित्य अकादमीचा पुरस्कार देण्यात आला. तर १९७१ साली “साहित्य अकादमीचे सदस्यत्व” ही बहाल करण्यात आले.

२१ ऑगस्ट १९८१ साली वयाच्या ९६ व्या वर्षी काकासाहेब कालेलकरांच वृद्धापकाळाने निधन झाले.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*