चिंतामण द्वारकानाथ अर्थात सी डी देशमुख

अर्थतज्ज्ञ, माजी केंद्रीय अर्थमंत्री

कुशल प्रशासक आणि अर्थतज्ज्ञ, माजी केंद्रीय अर्थमंत्री चिंतामण द्वारकानाथ देशमुख अर्थात सी.डी. देशमुख हे मराठी अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी होते. त्यांचा जन्म १४ जानेवारी १८९६ साली झाला. ते भारतीय रिझर्व बँकेचे तिसरे आणि मूळ भारतीय वंशाचे पहिले गव्हर्नर होते.
सी डी देशमुख हे एक सनदी अधिकारी होते. स्वातंत्र्यापुर्वी आणि त्यानंतर प्रशासनात अनेक पदांवर कामे केली.
ते १९३९ साली भारतीय रिझर्व बँकेच्या सेवेत अधिकारी म्हणून रुजू झाले. गव्हर्नर पदावर नियुक्ती होण्यापूर्वी ते रिझर्व बँकेतच आधी सचिव म्हणून आणि पुढे डेप्युटी गव्हर्नर (१९४१-४३) म्हणून कार्यरत होते. तर १९४३-१९४९ या काळात चिंतामणराव भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर म्हणून कार्यरत होते.
दि. १-जानेवारी-१९४९ रोजी रिझर्व बँकेचे राष्ट्रीयकरण त्यांच्याच कार्यकाळात झाले. १९५० ते १९५६ या काळात चिंतामणराव स्वतंत्र, सार्वभौम भारताचे पहिले अर्थमंत्री होते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा देउन ते बाहेर पडले.
त्यांनी इंपिरियल बँकेचे राष्ट्रीयीकरण, आयुर्विमाव्यवसायाचे राष्ट्रीयीकरण, ग्रामिण पतपुरवठा सर्वेक्षण याबाबतीत महत्त्वपूर्ण पावले उचलली. भारतातील नियोजनबध्द विकासाचा पाया घातला.
त्यांच्या योगदानाबद्दल १९४४ साली त्यांना सर किताब (knighthood) बहाल करण्यात आला.
ते सुप्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी आणि सामाजिक कार्यकर्त्या दुर्गाबाई देशमुख यांचे पती होते.
त्यांनी आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेवर भारताचे प्रतिनिधी म्हणून काम पाहिले. विद्यापीठ अनुदान मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिले. सरकारकडून त्यांना पद्मभूषण पदवी प्रदान करण्यात आली. देशातील आणि परदेशातील अनेक विद्यापीठांनी त्यांना सन्माननीय डॉक्टरेट पदवी प्रदान केली. त्यांचा मृत्यू २ ऑक्टोबर १९८२ रोजी झाला.
 ते संस्कृतचे गाढे अभ्यासक होते.

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

## C.D.Deshmukh

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*