क्रिडा विश्वात सामावणार्‍या प्रत्येकाची माहिती. क्रिकेट जरी भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ असला तरीही इतर अनेक खेळात मराठी खेळाडू आपली मोहोर ऊठवत आहेत. त्यांच्याविषयी माहिती येथे मिळेल.

देवलकर, अक्षय

वयाच्या ८ व्या वर्षापासून “बॅडमिंटन” खेळणार्‍या अक्षय देवलकर ह्याने क्रीडाक्षेत्रात ठाण्याचे नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवले आहे.
[…]

मुजुमदार, अमोल अनिल

अमोल मुजुमदार हा मुंबई, आसाम व आंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणार्‍या खेळाडूंपैकी तो एक आहे. प्रथम श्रेणीच्या सामन्यातील अनेक विक्रम अमोलच्या खात्यावर जमा आहेत.
[…]

निमगाडे, अनिल यादवराव

अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत.
[…]

यादव, स्वप्नाली

वेगवेगळ्या क्रीडा प्रकारांमध्ये अल्पवयीन भारतीय खेळाडुंनी दाखविलेले प्राविण्य आता जगमान्य झाले आहे. या क्रीडाप्रकारांमध्ये नव्यानेच आता एका आणखी आव्हानात्मक प्रकाराची भर पडली आहे ती म्हणजे जलतरण व जगभरातून वाखाणल्या गेलेल्या या क्रीडाप्रकाराच्या रथी महारथींमध्ये आपल्या अफाट कौशल्याच्या व आत्मविश्वासाच्या जोरावर अढळ ध्रुवस्थान मिळविणारी चिमुरडी म्हणजे स्वप्नाली यादव.
[…]

पाटील, संतोष

समजायला लागल्यापासून कुटुंबाला हातभार लावण्यासाठी वडिलांसोबत मासेमारीसाठी रात्रभर समुदावर राहायचे व सकाळी शाळेला हजेरीही लावायची, असे खडतर आयुष्य जगणार्‍या उरणच्या संतोष पाटील या जलतरणपटूने नुकतीच जिब्राल्टरची खाडी पोहून पार करण्याचा विक्रम केला. अशी कामगिरी करणारा संतोष हा पहिलाच ‘नौसैनिक’.

उरणच्या केगाव-दांडा या ग्रामीण भागात राहणार्‍या संतोषच्या पोहण्याच्या आवडीला एका ध्येयाचे रूप मिळाले ते सेंट मेरी आणि ‘नेटिव्ह स्कूल ऑफ उरण’ या शाळांमध्ये. शाळेत संतोषने जिल्हा, झोनल, राज्य आणि राष्ट्रीय पातळीवरील स्पर्धांत आपले भन्नाट वेगात पोहण्याचे कौशल्य दाखवले आणि वयाच्या १६व्या वर्षी धरमतर ते मुंबई हे अंतर ९ तास १६ मिनिटांत पार केले.
[…]

पुजारी, ऋचा

बुद्धिबळाच्या या खेळात अल्पावधीतच उत्तुंग झेप घेणाऱ्या ऋचा पुजारी या युवा खेळाडूचा मोठा वाटा आहे.
[…]

विजय हजारे

विजय हजारे हे सी. के. नृायडू यांचे शिष्य होते. १९५१ ते १९५३ ते भारतीय क्रिकेट टीमचे कप्तान राहिले होते. ॲ‍डीलेड येथे १९४८ मध्ये डॉन ब्रॅडमन यांच्या संघासमोर त्यांनी दोन्ही डावांत शतके झळकवण्याचा पराक्रम केला. […]

गावसकर, सुनील मनोहर

जगप्रसिद्ध क्रिकेटपटू. भारताचे माजी कर्णधार. कसोटी सामन्यांमध्ये भारतीय क्रिकेट संघाच्या इतिहासातील सर्वोत्तम आघाडीचा फलंदाज म्हणून त्यांना गणले जाते. भारतीय संघातर्फे त्यांनी १२५ कसोटी सामने खेळून ५१.१२ धावांच्या सरासरीने एकूण १०,१२२ धावा काढल्या. सुनील गावसकर यांचा […]

सुभाष गुप्ते

सुप्रसिद्ध क्रिकेटपटू सुभाष गुप्ते हे कसोटी क्रिकेटमधील एक सर्वोत्कृष्ट लेग स्पिनर होते.
[…]

1 3 4 5 6