समाजाच्या हितासाठी झटणार्‍या मराठी सामाजिक कार्यकर्त्याची माहिती

अत्रे, प्रल्हाद केशव (आचार्य अत्रे)

(1898 – 1969) प्रल्हाद केशव अत्रे हे महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व मानलं जातं. साहित्य, शिक्षण, नाटक, चित्रपट, राजकारण व पत्रकारिता अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी आपला ठसा उमटवला. या सर्वच क्षेत्रामध्ये त्यांचा विलक्षण दबदबा होता. जनमानसावर […]

आपटे, (डॉ.) वसुधा

आपल्या पणजी रमाबाई रानडे यांचा वारसा पुढे नेणार्‍या डॉ. आपटे या न्यायवैद्यक क्षेत्रातील एकमेव महिला ठरल्या तसेच कॉरोनर कोर्टातील एकमेव महिला कॉरोनर झाल्या… […]

गोगुलवार, (डॉ.) सतीश

दुर्गम आदिवासी भागात आरोग्याचा कानमंत्र देणार्‍या कार्यकर्त्यांची फौज डॉ. सतीश गोगुलवार यांनी उभी केली. या कामातून विश्वासाचा पूल बांधला गेला. डॉ. सतीश गोगुलवार यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात प्रकाशित झालेला मिशन आरोग्याचे हा […]

पाटील, (डॉ.) प्रमोद – (पक्षीसंवर्धक आणि संशोधक)

पदवीने एमबीबीएस असणारे डॉ. प्रमोद पाटील यांनी पक्षीसंवर्धनाच्या क्षेत्रात पारदर्शी असे काम केले आहे. काळाच्या पडद्याआड जात चाललेल्या माळढोक पक्षाला वाचविण्याच्या कामात डॉ. प्रमोद पाटील यांच्या संशोधनाने मुख्य बळ मिळाले. निसर्गरक्षक गिधाडांना वाचविण्याच्या कामीही त्यांनी […]

मुंजे, (डॉ.) धर्मवीर

भारतातील सैनिकी शिक्षणाचे प्रवर्तक, समाज सुधारक व निष्णात नेत्रविशारद धर्मवीर डॉ. बाळकृष्ण शिवराम मुंजे हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक महान द्रष्टे नेते होते. लोकप्रियतेची पर्वा न करता प्रसंगी लोकप्रवाहाच्या विरूद्ध उभे राहून समाजाच्या हिताचे तेच ठामपणे सांगणारे डॉ. मुंजे यांचे व्यक्तिमत्त्व तडफदार होते. १२ डिसेंबर १८७२ मध्ये विलासपूर येथे त्यांचा जन्म झाला. […]

रानडे, (न्या.) महादेव गोविंद

निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.
[…]

बेडेकर (डॉ.) वासुदेव ना

डॉ. वा ना बेडेकर हे ठाणे शहरातील एक पितृतुल्य व्यक्तिमत्त्व. ठाण्याच्या विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक असलेले डॉ. बेडेकर हे ठाणे शहराचे एक भूषण होते. […]

नानिवडेकर, श्रीराम कृष्ण

सामाजिक कार्याचा जन्मजात वारसा लाभलेले आणि मेकॅनिकल इंजिनिअर म्हणून ६० व्या वर्षी स्वेच्छानिवृत्ती घेतलेले श्रीराम कृष्ण नानिवडेकर हे ठाण्यातलं एक महत्वाचं व्यक्तिमत्व! जसे प्रत्येक शहरात सामाजिक बांधिलकी मानून निरपेक्षपणे सामाजिक कार्य करणारे कार्यकर्ते असतात, त्याचप्रकारे […]

1 2 3 13