विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात बहुमोल कामगिरी केलेल्या आणि करणार्‍यांबद्दल माहिती इथे सापडेल…

सत्येन कुलाबकर

MBA, HRD विद्याविभूषत सत्येन वयाच्या १८ व्या वर्षापासून रस्ते वहातुक सुरक्षा कार्यात काम करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वहातुकीचे सुरक्षा नियम व पालन शिकण्यावर त्यांचा विशेष भर असून वहातूक पोलीस कार्यालय आयोजित शंभराहून अधिक शिबीरांद्वारे अंदाजे १०००० विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. […]

जलतज्ज्ञ डॉ. माधवराव चितळे

१० वर्षे जबाबदारीच्या पदांवर काम केलेल्या लोकांमधून जगभरातील ४० व्यक्तींची निवड या अभ्यासक्रमासाठी केली जाते. चितळे यांची या मुलाखतीतून निवड झाली. प्रिन्स्टनमध्ये त्यांनी ‘सर्वोत्तम पर्विन फेलो’ हा सन्मान पटकावला. […]

महिला शास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी

‘प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्‌.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला. […]

संजय शंकर गायकवाड

संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे. ## Sanjay Shankar Gaikwad  

देवबागकर, (डॉ.) दीप्ती

जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्‍या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे […]

मेहेंदळे, निर्मल

प्रदूषण होते म्हणून कारखानेच कसे बंद करणार? उलट कारखान्यांमधील टाकाऊ पदार्थ, पाणीव्यवस्थापन याबाबत शास्त्रीय कसोट्या वापरुन प्रदूषण रोखणे, हा त्यावरचा उपाय. हरयाणात स्थिरावलेले प्रदूषण नियंत्रक इंजिनीअर निर्मल मेहेंदळे हे गेली तीन दशके उद्योगांमध्ये पर्यावरणाचा शास्त्रीय […]

आंदे, सुभाष

पाणी शुद्ध करण्यासाठी ‘नीरी-झर’ ही गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल अशी ही सोपी पद्धत त्यांनी विकसित केली.  […]

केळकर, (डॉ.) रंजन

आधुनिक तंत्रज्ञानाची मदत घेऊन पावसाचा अचूक अंदाज करणार्‍यांमध्ये डॉ. रंजन केळकर यांचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. भारतीय हवामान विभागाचे (आयएमडी) महासंचालक झालेले ते पहिले मराठी शास्त्रज्ञ… डॉ. रंजन केळकर यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या […]

आपटे, (डॉ.) दीपक

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. दीपक आपटे यांनी सागरीजीवन संवर्धनाच्या ध्यासपोटी भारताचा किनारा पालथा घातला आहेच, आणि५ हजार तासांचे स्कूबा डायव्हिंग केले आहे… डॉ. दीपक आपटे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात […]

1 2