विज्ञान-तंत्रज्ञान, इतिहास, भाषा, साहित्य, संस्कृती अशा विविध विषयांवर संशोधन करणार्‍या संशोधकांची माहिती.

डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होत्या. कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’. […]

वाहूळ, (डॉ.) एम.ए.

एखाद्या माशाच्या शरीरात परोपजीवी घटक त्याला आतून खात असेल तर? तर या माशांची संख्या कमी होईलच, पण त्यावर अवलंबून असणारी अन्नसाखळीही रोडावेल. प्राणीशास्त्राचे संशोधक डॉ.एम.ए. वाहूळ यांचे संशोधन यादृष्टीने महत्त्वाचे आहे… डॉ.एम.ए. वाहूळ यांच्याविषयी महाराष्ट्र […]

भालेराव, वरुण

खगोल आॉलम्पियाडमध्ये भारताला सलग दोन वर्षे सुवर्णपदक त्याने मिळवून दिली. ज्या आयुकात त्याला प्रश्नमंजुषा स्पर्धेत ग्रहतार्‍यांनी खुणावले. त्याच आयुका संस्थेत आज तो संशोधक आहे. अमेरिकेतील कॅलटेक विद्यापीठात पीएचडी करुन भारतात परतलेला वरुण भालेराव अॅस्ट्रोसॅट उपग्रहनिर्मितीवर […]

देवबागकर, (डॉ.) दीप्ती

जीवतंत्रज्ञानासारख्या आधुनिक विषयातील संशोधनात स्वत:चे आगळे स्थान निर्माण करणार्‍या पुणे विद्यापीठाच्या प्राणीसास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक डॉ. दीप्ती देवबागकर विज्ञान प्रसारकही आहेत. विज्ञान लोकाभिमुख करण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत. जनुकाचे कामकाज बदलल्यामुळे कॅन्सरच्या पेशंटांवर होणारे […]

आंदे, सुभाष

पाणी शुद्ध करण्यासाठी ‘नीरी-झर’ ही गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल अशी ही सोपी पद्धत त्यांनी विकसित केली.  […]

पाटील, (डॉ.) एल.ए.

सायनाइडपेक्षा पाचशे पटींनी घातक असलेल्या ‘सरीन’ सारख्या वायूचा वापर करुन रासायनिक अस्त्रे बनवले जाण्याचा धोका जगाला भेडसावत आहे. या वायूचे अस्तित्व शोधणारे सेन्सर डॉ. एल.ए. पाटील यांनी विकसित केले. विशेष म्हणजे, हे संशोधन त्यांनी अमळनेरसारख्या […]

धोंडगे, (डॉ.) दिलीप

संत तुकारामांच्या अभंगरचनांचा विज्ञानाच्या माध्यमातून वेध घेऊन संतसाहित्य, वारकरी परंपरा यांचा समकालाशी नव्याने अन्वयार्थ लावणे असो किंवा कवी अरूण कोलटकर यांच्या कवितेतील मानवी वृत्ती-प्रवृत्ती, बोलीभाषा, लोकभाषा याविषयीचे भाषिक सत्व उलगडून कवितेत शिरण्याची वाट सोपी करण्याचे […]

कोतवाल, (डॉ.) आशुतोष

सध्या अमेरिकेत असलेल्या डॉ. आशुतोष कोतवाल यांनी ‘हिग्ज बोसॅन’ या मूलकणांच्या आकारमानाबाबत संशोधन केले आहे. त्याची दखल जगभरातील भौतिकशास्त्रज्ञांनी घेतली आहे… विश्वाची रचना आणि त्याच्या जडणघडणीचे रहस्य उकलण्यासाठी उपयुक्त ठरणाऱ्या ‘डब्ल्यू बोसॉन’ या मूलकणांचा शोध […]

आपटे, (डॉ.) दीपक

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतील सागरी जीवशास्त्रज्ञ डॉ. दीपक आपटे यांनी सागरीजीवन संवर्धनाच्या ध्यासपोटी भारताचा किनारा पालथा घातला आहेच, आणि५ हजार तासांचे स्कूबा डायव्हिंग केले आहे… डॉ. दीपक आपटे यांच्याविषयी महाराष्ट्र टाईम्सच्या म.टा. नोंद या सदरात […]

1 2 3 9