डॉक्टर, वकील, सनदी लेखापाल, वास्तुविशारद यांसारख्या व्यावसायिकांची माहिती…

महिला शास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी

‘प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्‌.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला. […]

डॉ.अभय बंग

बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते. […]

`कालनिर्णय’ दिनदर्शिकेचे संस्थापक जयंत साळगावकर

साळगांवकरांनी पंचांग आणि दिनदर्शिका यांचा उत्तम मेळ घालून ‘कालनिर्णय’ ही नऊ भाषांतून प्रसिद्ध होणारी दिनदर्शिका म्हणून ख्याती मिळविली. जयंत साळगावकर हे सर्वाधिक खपाच्या `कालनिर्णय` या दिनदर्शिकेचे संस्थापक आहेत. `कालनिर्णय’ आंतरराष्ट्रीय पातळीवर ब्रँड म्हणूनही प्रस्थापित करण्यात त्यांना यश मिळाले. एकटय़ा मराठी भाषेत कालनिर्णय दिनदर्शिकेचा खप ५० लाखांपेक्षा जास्त आहे. ही दिनदर्शिका १९७३ पासून प्रसिद्ध होत आहे. […]

उमाशंकर दाते

उमाशंकर उर्फ बाळा सुरेश दाते हे एक भारतीय बनावटीचे एकमेव ऑर्गन उत्पादक आहेत. […]

डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक)

मोहन भागवत हे २००९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे. […]

डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे

निष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. “वाग्भट” या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते. “स्त्रीरोगविज्ञान” या ग्रंथासह “ज्ञानेश्वरी” व “अमृतानुभव” या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. १५ जुलै १८९६ रोजी त्यांचे निधन झाले.   Dr Anna Moreshwar Kunte

डॉ. विष्णू गोपाळ आपटे

डॉ.  विष्णू गोपाळ आपटे यांनी अनेक वैद्यकीय पुस्तकांचे लेखन केले. डॉक्टर असणार्‍या आपट्यांनी “ग्रामवैद्य अथवा खेड्यांतील प्रजा निरोगी राहण्याचे उपाय”, “न्यायवैद्यक” तसेच “प्रसुतिचिकित्सा” ही पुस्तके लिहिली. २० जुलै १८९८  रोजी त्यांचे निधन झाले.   Dr Vishnu Gopal […]

डॉ. गोपाळ शिवराम लागवणकर

डॉ. गोपाल शिवराम लागवणकर  हे  निष्णात शल्यचिकित्सक (सर्जन) व वैद्यकीय ग्रंथांचे लेखक होते. मराठीत “शस्त्रवैद्यक” आणि ”न्यायवैद्यक” ही पुस्तके त्यांनी लिहिली, तसेच “दंभहारक” या टोपण नावाने अनेक लेख लिहिले. […]

सुभाष काळे (Adv)

व्यवसायाने वकील असलेले सुभाष काळे हे ठाणे शहराचे माजी उपमहापौर आहेत. भारतीय जनता पक्षाचे ते पदाधिकारी आहेत. […]

डॉ. जगदीश सामंत

कुष्ठरोगाचं निर्मूलन व्हावं, कुष्ठरोग्याला समाजात मानाचं स्थान मिळावं ही महात्मा गांधींची इच्छा होती. डॉ. सामंत यांनी गांधीजींचा हा संदेश आपल्या कामात उतरवला. त्यांच्या कामाचा भारतीयांना गर्व असेल,’ हे उद्गार आहेत, भारताचे उपराष्ट्रपती अन्सारी यांचे. डॉ. जगदीश सामंत यांना मानाच्या अशा, ‘ गांधी इंटरनॅशनल अवॉर्ड ‘ ने गौरवण्यात आलं आहे. […]

1 2 3 4 9