भालचंद्र नीळकंठ पुरंदरे

त्यांचे विशेष संशोधन म्हणजे गर्भाच्या खांद्याच्या (अॅ्ण्टिरियर शोल्डर) हालचालीवरून प्रसूतीच्या प्रगतीचा अंदाज घेणे. गर्भाशयाच्या स्खलनाची शस्त्रक्रिया त्यांनी सुधारली. […]

परशुराम यशवंत वैद्य खडीवाले

परशुराम वैद्य यांनी हवाई दलातून निवृत्त झाल्यानंतर पुण्यात येऊन ‘हरी परशुराम औषधालय’ सुरू केले. याचबरोबर त्यांनी आयुर्वेदाशी संबंधित अनेक पुस्तकेही लिहिली. […]

डॉ. रखमाबाई जनार्दन सावे

Licentiate of the Royal College of Physicians and Surgeons’ ही पदवी मिळाल्यानंतर त्यांचं नांव इंग्लंडच्या ‘मेडिकल रजिस्टर’मध्ये सनदशीर दाखल झालं.रखमाबाईंना शिक्षणात आर्थिक मदत करणाऱ्या ‘डफरिन फंडा’तर्फे एकूण सात रुग्णालये उघडण्यात आली. पहिलं दिल्लीत निघालं. त्यानंतर मुंबईत ‘कामा हॉस्पिटल’, नंतर मग सुरत, बडोदा, मद्रास अशी पुढची रुग्णालयं चालू झाली. रखमाबाईंनी डॉक्टरी व्यवसायाची सुरुवात कामा हॉस्पिटलमध्ये केली. तिथे त्यांची नेमणूक ‘हाऊस सर्जन’ म्हणून झाली. […]

डॉ. तात्याराव लहाने

बाबा आमटेंच्या आनंदवन आश्रमात आशा शस्त्रक्रियेमुळे ३५ टक्यांवरुन १ टक्का इतका खाली गुंतागुंतीचे प्रमाण आणले आहे. यशस्वी कॉर्नियल प्रत्यारोपण करुन अंध आणि प्रौढांना नवी दृष्टी दिली आहे. […]

डॉ. जगन्नाथ दीक्षित

डॉ. दीक्षित हे लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात रोगप्रतिबंधक आणि सामाजिक शास्त्र विभागाचे विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहेत. […]

महिला शास्त्रज्ञ डॉ. कमलाबाई सोहोनी

‘प्राणिमात्रांप्रमाणे सर्व वनस्पतीतीलही साऱ्या जीवनक्रिया ‘सायटोक्रोन-सी’च्या मध्यस्थीने एन्झाइम्समुळे होतात, हे मूलभूत महत्त्वाचे संशोधन सादर करून १९३९ साली केंब्रिज विद्यापीठाची विद्यावाचस्पती(पीएच्‌.डी.)ही पदवी संपादन केली. इतरांचे प्रबंध हजार-पंधराशे पानांचे असताना, कमलाबाईंचा प्रबंध अवघ्या ४० पानांचा होता आणि तो त्यांनी त्यावेळी एका व्याख्यानाद्वारे सभागृहापुढे ठेवला. […]

डॉ.अभय बंग

बालमृत्यूच्या प्रश्नावर त्यांनी शोधलेले घरोघरी नवजात बालसेवा हे मॉडेल जगभरातील अविकसित देशांमध्ये व भारतात ९ लाख आशांव्दारे बालमृत्यू कमी करण्यासाठी वापरले जाते. त्यांच्या सर्च संस्थेचे कार्य व कार्यपध्दती जॉन्स हॉपकिन्स विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट असून विद्यार्थ्यांना ‘केस स्टडी’ म्हणून शिकवले जाते. […]

डॉ. मोहन भागवत (सरसंघचालक)

मोहन भागवत हे २००९ मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक झाले आहेत. ते ब्रह्मचारी आहेत व त्यांनी भारत व विदेशात भरपूर भ्रमण केले आहे. […]

डॉ. अण्णा मोरेश्वर कुंटे

निष्णात डॉक्टर अण्णा मोरेश्वर कुंटे हे ज्ञानेश्वरीचे गाढे अभ्यासक आणि लेखक होते. “वाग्भट” या त्यांच्या ग्रंथावरून त्यांच्या आयुर्वेदावरील दांडग्या अभ्यासाची कल्पना येते. “स्त्रीरोगविज्ञान” या ग्रंथासह “ज्ञानेश्वरी” व “अमृतानुभव” या ग्रंथांचे त्यांनी संपादन केले. १५ जुलै १८९६ रोजी त्यांचे निधन झाले.   Dr Anna Moreshwar Kunte

डॉ. विष्णू गोपाळ आपटे

डॉ.  विष्णू गोपाळ आपटे यांनी अनेक वैद्यकीय पुस्तकांचे लेखन केले. डॉक्टर असणार्‍या आपट्यांनी “ग्रामवैद्य अथवा खेड्यांतील प्रजा निरोगी राहण्याचे उपाय”, “न्यायवैद्यक” तसेच “प्रसुतिचिकित्सा” ही पुस्तके लिहिली. २० जुलै १८९८  रोजी त्यांचे निधन झाले.   Dr Vishnu Gopal […]

1 2 3