ग्रामपंचायतीपासून ते थेट दिल्लीपर्यंत पोहचलेल्या नेत्यांची माहिती

अर्जुन उमाजी डांगळे

मराठी साहित्यक्षेत्रात मराठी साहित्यिकांसाठी उदंड पुरस्कार असले तरी अन्य भारतीय भाषांमधील लेखकाचा गौरव करणारा एकही पुरस्कार नाही. अशावेळी चेन्नईची बुकसेलर्स अॅण्ड पब्लिशर्स ऑफ साऊथ इंडिया ही संस्था तमिळेतर भाषेतील साहित्यिकांना एक लाख रुपयांचा घसघशीत पुरस्कार देते आणि त्या पुरस्कारासाठी मराठीतील ज्येष्ठ लेखक अर्जुन डांगळे यांची निवड झाली. त्यांच्या या समग्र जीवनभानाचा गौरव दक्षिणेतील ‘कला अय्यंगार’ पुरस्काराने झाला आहे. […]

कर्वे, धोंडो केशव

विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. […]

आंबेडकर, (डॉ.) भीमराव रामजी

भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार आणि दलितांच्या उद्धारासाठी आपलं संपूर्ण जीवन पणाला लावलं असे थोर तत्वज्ञ आणि राजकीय नेते म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्थान निर्विवाद आहे. […]

बाळ केशव ठाकरे (बाळासाहेब ठाकरे)

मूळचे एक उत्कृष्ट व्यंगचित्रकार असलेले श्री बाळासाहेब ठाकरे हे शिवसेना या राजकीय पक्षाचे संस्थापक. बाळासाहेबांनी १९ जून, १९६६ रोजी ‘शिवसेनेची स्थापना केली. श्री बाळासाहेब ठाकरे सामना या मराठी दैनिकाचे मुख्य संपादक होते.
[…]

पाटील, नाना (क्रांतिसिंह)

जन्म- ३ ऑगस्ट, १९०० मृत्यू- १९७६ क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. महाराष्ट्रात (प्रामुख्याने सातारा, सांगली भागात) स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणारे, तसेच प्रतिसरकार हा समांतर शासनाचा एकमेवाद्वितीय प्रयोग […]

1 8 9 10 11 12 14