मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

पोहरकर, (डॉ.) संजय गोविंदराव

डॉ. संजय गोविंदराव पोहरकर हे लाखनी, या भंडारा जिल्ह्यामधील गावामध्ये वास्तव्यास असणारे प्रतिभावंत साहित्यीक, व कलाकारी वृत्तीचे कवी आहेत. शिक्षण कला व साहित्य या एकमेकांस बर्‍यापैकी पुरक असलेल्या प्रांतांमध्ये त्यांचा राबता लक्षणीय स्वरूपाचा आहे. पेश्याने शिक्षक, आवडीने साहित्यीक व उत्तुंग प्रतिभेने कवीत्व स्वीकारलेल्या पोहरकरांचे व्यक्तिमत्व या तिनही क्षेत्रांवर साज चढवणारेच आहे.
[…]

लोहबरे, नरेंद्र श्रवणजी

नरेंद्र श्रवणजी लोहबरे यांचा जन्म 16 एप्रिल, 1976 रोजी भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यामध्ये झाला. व्यवसायाने शिक्षक असलेल्या नरेंद्रजी यांना देश विदेशांतील पुरातन तसेच आर्वाचीन काळामधली नाणी जमविण्याचा फार मोठा छंद आहे […]

मुळे, गजानन

गजानन मुरलीधर मुळे यांचा जन्म ९ मे १९८३ मध्ये लातुर येथे झाला. ‘कधीच इथे मी’ ह्या त्यांच्या प्रसिध्द कवितासंग्रहाला नुकताच राजकीय स्तरावरील काव्यलेखन सोहळ्यामध्ये, सैला सायनकर यांच्या हस्ते विशेष पुरस्कार प्राप्त झाला.
[…]

सुर्यवंशी, (डॉ.) रमेश सीताराम

डॉक्टर रमेश सीताराम सुर्यवंशी हे संशोधक वृत्तीचे शिक्षक, व आदिवासी बोली भाषांमधले तज्ञ मानले जाणारे एक बहुरंगी व बहुढंगी व्यक्तिमत्व आहे. शिक्षण, भाषाशास्त्र, व लोकसाहित्याचे गाढे आभ्यासक, तसेच प्रतिभावंत लेखक म्हणून त्यांनी समाजात त्यांच्या नावाचा आदरयुक्त दबदबा निर्माण केला आहे. आजवरच्या त्यांच्या शैक्षणीक प्रवासावरूनच, डॉक्टरांच्या असामान्य बौध्दिक क्षमतांची व आभ्यासु व्रुत्तीची झेप आपल्या त्वरीत लक्षात येईल, अशा कौतुकास्पद तर्‍हेने त्यांनी ही कारकिर्द घडवली आहे.
[…]

दिवाण, श्रीरंग मनोहर

श्रीरंग मनोहर दिवाण हे नागपुरमधील प्रसिध्द ज्योतिषी, प्रवचनकार, व वास्तुदोषनिवारण तज्ञ आहे. वास्तुशास्त्राच्या काही निकषांवर तसेच सिध्दांतांवर आज आधुनिक विज्ञानही विश्वास ठेवित असल्यामुळे आज अगदी सर्वच व्यवसायांमधील नवीन वास्तु बांधणारे लोकं, वास्तुशास्त्राप्रमाणे निर्दोष मानल्या गेलेलं घर बांधण्याकडे आपला कल ठेवतात.
[…]

बामणे, निलेश दत्ताराम

निलेश दत्ताराम बामणे हे ठाण्यामधील प्रतिभावंत व हौशी लेखक व कवी असून नुकतेच त्यांच्या ‘कवितेचा कवी’ व ‘प्रतिभा’ या दोन कवीतासंग्रहांनी, अगदी थाटात मराठी कविताविश्वामध्ये आगमन केले. ठाण्याच्या सिध्दी फ्रेन्डस पब्लिकेशनतर्फे प्रकाशित झालेले हे कवितासंग्रह अनुक्रमे 2009 व 2010 मध्ये प्रकाशित झाले व त्यांना मराठी रसिकांकडुन उदंड प्रतिसाद लाभला.
[…]

भोसले, दिनकर दत्तात्रय (चारूता सागर)

मराठी कथाविश्वाला जळजळीत वास्तवदर्शी संकल्पनांचा स्पर्श देवून वाचकांना त्यांनी कधी स्वप्नातही ज्याची कल्पना केली नसेल, अशा भयाण परंतु भारतात अनेक ठिकाणी अस्तित्वात असलेल्या विश्वाची सैर, प्रत्यक्ष अनुभवायला कोणी लावली असेल तर ती चारूता सागर ह्यांनीच. गरीब लोकांचे जीवन, त्यांच्या व्यथा, वेदना, अपेक्षा, व माणुस म्हणून इतरांकडून त्यांना किमान मानाची वागणूक मिळावी, अशी त्यांची रास्त आशा जेव्हा पुर्ण झाली नाही तेव्हा, चारूता सागरांची कथा जन्माला आली.
[…]

दादरकर, अद्वैत

अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत. […]

अवचट, संदीप

संदीप अवचट हे नामांकित व विश्वासार्ह मानले जाणारे प्रसिध्द ज्योतिषी, व प्राचीन ज्योतिर्विद्या तसेच अर्वाचीन अंकशास्त्राचे गाढे आभ्यासक व चिकीत्सक आहेत. […]

जगताप, (प्रा.) बापुराव

प्राध्यापक बापुराव जगताप हे प्रख्यात नामांतरवादी नेते, लेखक, व निळ्या पहाडीवरच्या कवितांचे जनक असे अष्टपैलु व्यक्तिमत्व होते. आंबेडकरांचे कट्टर अनुयायी व गाढे आभ्यासक असलेले जगताप हे अखेरच्या श्वासापर्यंत त्यांच्या तत्वप्रणालीशी एकनिष्ठ राहिले. औरंगाबाद येथील वसंतराव नाईक महाविद्यालयातून प्रा. बापुराव जगताप हे मराठी विभागप्रमुख म्हणून 2001 साली निवृत्त झाले होते.
[…]

1 39 40 41 42 43 57