मराठी लेखक, कवी, कथाकार, गीतकार, समीक्षक, प्रवासवर्णनकार, नाटककार, भाषांतरकार…. म्हणजेच मराठी शब्दांशी नातं असणार्‍या साहित्यिकांविषयी…

चिटणीस, अशोक सिताराम

ठाण्यातील डॉ. बेडेकर विद्यामंदीराचे ३० वर्षं प्राचार्य म्हणून कार्यभार वाहिलेल्या अशोक चिटणीस यांनी शिक्षण विषयक, साहित्यविषयक, सांस्कृतिक अशा अनेक कार्यक्रमांचे संयोजन केले आहे.
[…]

केळुसकर, (डॉ.) महेश वासुदेव

मराठी साहित्यक्षेत्रात आपल्या कवितांनी एक वेगळा ठसा उमटवलेले कवी डॉ. महेश वासुदेव केळूसकर हे ही ठाण्याचेच रहिवासी आहेत. मुळचे सिंधुदुर्गचे असणारे केळूसकर ठाण्यातील साहित्य – सांस्कृतिक क्षेत्रात ग्रंथालय चळवळीसाठी भरीव योगदान देत आहेत.
[…]

जाईल, नारायण जनार्दन

स्थापत्यशास्त्रातील पदवी, कोयना प्रकल्प, अवजड अभियांत्रिकी प्रकल्प (रांची), उद्योग मंत्रालय (नवी दिल्ली) असे अभियांत्रिकी क्षेत्रात पाच दशकांहून अधिक काळ कार्यरत असलेले नारायण जनार्दन जाईल यांना ठाणं ओळखतं ते त्यांच्या लेखनामुळे.
[…]

चिटणीस, (डॉ.) शुभा अशोक

हिंदी विषयात एम.ए.पी.एच.डी. करणार्‍या मुंबई विद्यापीठात आणि बेडेकर महाविद्यालयात २५ वर्षं अध्यापनाचे कार्य करणार्‍या; तसंच नियतकालिकं, वृत्तपत्र यांतून सातत्याने लेखन करणार्‍या डॉ. शुभा चिटणीस या ठाण्यातील एक यशस्वी व्यक्तिमत्व !
[…]

पालवणकर, नीलिमा

साहित्य क्षेत्रातील ठाण्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे निलीमा पालवणकर IM.A.M.Phil (मराठी साहित्य) या विषयातून करुन त्यांनी एक वर् मराठीची प्राध्यापिका म्हणून आचार्य मराठे महाविद्यालयात अध्यापनाचं कार्य केलं. १८ महिने “वृत्तमानस” मध्ये दर पंधरा दिवसांनी एक, कवितेवर आधारित रसग्रहण पद्धतीचे स्तंभलेखनही त्यांनी केलं. 
[…]

समेळ, अशोक मनोहर

लहानपणापासून कलेची आवड असणार्‍या अशोक समेळ यांनी घरच्या गरीबीवर जिद्दीने मात करुन अपार मेहनतीने आतापर्यंतचा पल्ला गाठला आहे. विविध क्षेत्रात काम करणार्‍या समेळांची कामगिरीही तितकीच विविधांगी आहे.
[…]

ढवळ, (प्रा.) प्रदीप

एखाद्या व्यक्तिचं कर्तुत्व आणि त्यांची आपल्या ध्येयाप्रती असलेली निष्ठा ही त्याला एका अशा पदावर नेऊन ठेवते जिथे तो माणूस यशाच्या मागे लागत नाही तर यश त्याच्या मागे लागतं. पण त्यावेळी देखील यशापशाची पर्वा न करता आपल्या कामात, त्या कामाच्या धुंदीतच जगायला त्याला आवडतं.
[…]

बोरकर, संजय लक्ष्मण

अभिनय दिग्दर्शन, लेखन, डबींग, नेपथ्य व प्रकाश योजना ह्या आणि अशा विविध क्षेत्रांत आपला ठसा उमटविणारे संजय बोरकर ह्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ठाण्यातील शिवसमर्थ विद्यालयातून एकांकिका स्पर्धांमधून झाली. […]

पवार, प्रज्ञा दया

ख्यातनाम साहित्यिक पद्मश्री दया पवार यांची कन्या असल्याने लिहिण्याचा वारसा त्यांना घरातून मिळाला. आई हिरा पवार प्राथमिक शाळेमध्ये शिक्षिका आणि मुख्याध्यापिका.
[…]

कोनकर, शशिकांत

शशीकांत कोनकर ह्यांच्या मते ठाणे हे जणू मुंबईजवळचे पुणे आहे. उद्याच्या ठाण्याकडे पाहताना ते म्हणतात की ते नितांत सुंदर, स्वच्छ व संस्कृती जपणारे असावे. ठाणे विद्येचे माहेरघर आहे असंही ते म्हणतात.
[…]

1 35 36 37 38 39 57