लेखक

प्रविण कारखानीस

भुंगा जसा चंचलपणे एका फुलावरून दुसरीकडे उडून प्रत्येक फुलामधील मधाचा आस्वाद घेत असतो तश्याच प्रकारे काही व्यक्तींना सतत दुसर्‍या देशांना व अगदी दुसर्‍या टोकांवर असलेल्या प्रेक्षणीय स्थळांना भेटी देण्याची हुरहुर लागलेली असते व अशा प्रवासवेड्या कलंदरांमध्ये प्रवीण कारखानीस यांचे नाव आवर्जुन घ्यावेसे वाटते. पायाला भिंगरी लावल्याप्रमाणे त्यांनी निरनिराळ्या देशांना व तिथल्या ऐतिहासिक स्थळांना आभ्यासपुर्ण भेटी देवून तिथल्या संस्कृतींशी समरस होण्यात, व तिथल्या पारंपारिक कलांचा व पदार्थांचा आस्वाद घेण्यातच आपल्या जीवनातील बराचसा काळ व्यतित केला आहे. […]

रामदास फुटाणे

सामना चित्रपटाला तीन राष्ट्रीय पुरस्कार, फिल्म फेअर ऍवॉर्ड, राज्य पुरस्कार मिळाले. बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी त्याची निवड झाली. सर्वसाक्षी चित्रपटाची बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हाँगकाँग येथे झालेल्या पाचक्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सकासाठी निवड झाली होती. […]

राजेंद्र खेर

बिंदुसरोवर, देह झाला चंदनाचा, देवांच्या राज्यात, धनंजय, दिग्विजय, गीतांबरी, दी साँग ऑफ सॅल्व्हेशन, उदयन अशी त्यांची पुस्तकं प्रसिद्ध आहेत. राजेंद्र खेर यांचे पांडुरंगशास्त्री आiठवले यांच्या जीवनावरचे ‘देह झाला चंदनाचा’ हे पुस्तक, त्याच्या १९ आवृत्त्या निघाल्या, त्याचे गुजराती, हिंदी आणि इंग्रजीत भाषांतरे ही झाली. […]

राजा राजवाडे

राजा राजवाडे यांचा त्यांच्या मित्रावर खूप लोभ.म्हणूनच त्यांच्या ‘दोस्ताना’ या व्यक्तिचित्रण संग्रहात त्यांनी आरती प्रभू, नारायण सुर्वे, रमेश मंत्री, वसंत सावंत, श्याम जोशी, मधु मंगेश कर्णिक या मित्रांबद्दल खूप प्रभावीपणे लिहिले आहे. […]

रवींद्र पिंगे

कथा,कदंबरी,प्रवासवर्णन,ललित असे विविध साहित्य प्रकार हाता़ळणारे,विविधांगी लेखन करुन आपल्या प्रतिभेचा साक्षात्कार करुन देणारे प्रख्यात शैलीदार ललित लेखक रवींद्र पिंगे यांनी ‘प्राजक्ताची फांदी’,’मोकळ आकाश’,’मुंबईचं फुलपाखरु’,’आनंदपर्व’, ‘आनंदाच्या दाही दिशा’ देवाघरचा पाऊस’ असे ३२ पुस्तकांचे लेखन त्यांनी केले होते. […]

य. गो. जोशी

य.गो. जोशी यांची ’एक रुपया दोन आणे’ ही पहिली कथा यशवंत या मसिकात १९२९ साली प्रसिद्ध झाली. आणि याच मासिकाच्या कथास्पर्धेत य.गो. जोशींच्या ’शेवग्याच्या शेंगा’ या कथेस पहिले पारितोषिक मिळाले. […]

महाराज श्रीमंत सयाजीराव गायकवाड (तिसरे)

२८ डिसेंबर १८८१ रोजी गादीवर आल्याबरोबर सयाजी रावांनी राज्याची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी उपाययोजना केल्या. प्रशासकीय जबाबदारीची विभागणी हे तत्त्व राज्यकारभारात लागू करून राज्ययंत्रणेत त्यांनी सुरळीतपणा निर्माण केला, सल्लागार नेमून कल्याणकारी योजना अंमलात आणल्या. […]

मनोहर श्याम जोशी

भारतीय समाजाचं प्रतिबिंब असणाऱ्या त्या मालिकांनी दर्शकांना अनेक वर्षं बांधून ठेवलं होतं. याशिवाय त्यांनी लिहिलेल्या ‘मुंगेरीलाल के हसीन सपने’,‘काकाजी कहीन’,‘हमराही’,‘जमीन आसमान’,‘गाथा’यांसारख्या मालिकाही लोकप्रिय झाल्या होत्या. […]

मधुकर दत्तात्रेय हातकणंगलेकर

’जीएं’शी झालेला त्यांचा पत्रव्यवहार पुढे हातकणंगलेकरांनी खंडरूपान्रे प्रसिद्ध केला. पुढे त्यांनी अनेक इंग्रजी कथांचे मराठीत लेखन केले, तर गो.नी.दांडेकर यांची माचीवरचा बुधा आणि व्यंकटेश माडगूळकर यांची सती या कांदबर्यांीचे इंग्रजीत अनुवाद केले. […]

मकरंद देशपांडे

मकरंद देशपांडे याच्या भूमिका असलेले चित्रपट रिस्क, डरना जरूरी है, हनन, एक से बढकर एक, स्वदेश, चमेली, विस्फोट, मकडी, लाल सलाम, रोड, प्यार दिवाना होता है, जंगल, घात, सरफरोश, सत्या, उडान, नाजायज, अंत, तडीपार, पहला नशा, सर इत्यादी. त्यांचा ‘दगडी चाळ’ हा चित्रपटात नुकताच येवून गेला. […]

1 2 3 23