ज्या उद्योजकांनी आणि विविध धंदे करणार्‍यांनी आपल्या कामातून महाराष्ट्राचीच नाही तर देशाची मोहर जगात उमटवली आणि जे स्वत:ला सिध्द करू पाहतायेत अशा सर्व मराठी उद्योजकांची ओळख. मराठी माणुस व्यवसाय करू शकत नाही हे खोटं ठरविणार्‍या मराठी माणसांबाबत..

तिरोडकर, गजानन

गजाननराव उर्फ दादासाहेब तिरोडकर, यांचा जन्म कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील केसरी या लहान व निसर्गरम्य गावात झाला. असामान्य महत्वाकांक्षा व यशाच्या आभाळाला सहज गवसणी घालू शकणारी प्रखर बुध्दिमत्ता यांचा उत्तम संगम त्यांच्या ठायी झाला असल्या कारणाने त्यांचा ओढा हा कुणाच्या तरी हाताखाली काम करण्यापेक्षा, स्वतःचा एखादा व्यवसाय थाटून त्यात इतरांपेक्षा काही भव्य दिव्य करून दाखविण्याकडे जास्त होता. उद्योगविश्वात पाय रोवण्यासाठी आवश्यक असलेली जिद्द व मानसिक तयारी अंगी बाणविल्यानंतर त्यांनी ग्लोबल समुहाची बीजे पेरली. त्या काळात भांडवलाची फारसी उपलब्धता नसतानाही विश्वासु व होतकरू मनुष्यबळाच्या जोरावर त्यांनी उद्योगाचा श्रीगणेशा केला.
[…]

घाटगे, विष्णु माधव

विष्णु माधव घाटगे हे भारताला हवाई क्षेत्रामधील स्वयंसिध्दतेकडे घेवून जाणारे एक महान वैज्ञानिक, उद्योगपती, व कारखानदार अशा तिहेरी भुमिकेतील तारणहार होते. या तारणहार म्हणण्याला कारणही तसेच आहे, जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा विमान निर्मीतीसारख्या मोठ्या, किचकट, व आधुनिकतेबरोबरच भक्कम आर्थिक पाठबळ लागणार्‍या उद्योगधंद्यात उतरायला कोणीच धजत नव्हते. तेव्हा या प्रचंड उर्जेच्या, व व्यावसायिक कौशल्यांनी ओतप्रोत भरलेल्या उद्योजकाने कुणाच्याही मदतीशिवाय या पठडीबाहेरच्या, व आव्हानात्मक क्षेत्रात उडी मारली होती. घाटगे यांनी त्यांच्या स्वप्नवत कारकीर्दीमध्ये अनेक प्रकारची विमाने बनविली व विकलीसुध्दा. आपल्या डोक्यातही येणार नाही अशा कितीतरी दैनंदिन गोष्टी विमानाच्या साहाय्याने सुसह्य व गतिमान कशा करता येवू शकतात हे त्यांनी प्रत्यक्ष दाखवून दिले होते. जसे पिकांवर औषधे व किटकनाशके फवारण्यासाठी कृषक हे चालवण्यास अतिशय सहज सोपे, व खिशाला परवडणारे विमान त्यांनी सामान्य शेतकर्‍यांसाठी बनविले होते. घाटगे यांनी ज्याप्रमाणे बाहेरच्या देशांना भारत कशा प्रकारे राखेतून सुरूवात करून आपल्या कर्तुत्वाची सुंदर व कल्पक रांगोळी निर्माण करू शकतो हे दाखवून दिले होते, त्याचप्रमाणे त्यांनी असंख्य उद्योजक होऊ पाहणार्‍या नव-तरूणांना प्रेरणा व आत्मविश्वासाचे तेज दिले होते. गुलाम गिरीची पुटं कधीच झाडली गेली होती व एक नव तंत्रज्ञानाचं, व विज्ञानाचं लख्ख आभाळ भारताला साद घालत होतं, या सादेला सर्वप्रथम प्रतिसाद दिला तो या स्वप्नाळू, परंतु बेहद निश्चयी मराठमोळ्या तरूणाने.
[…]

जोशी, जुई

जुई जोशी ह्या फिलान्थ्रोपिक एन्गेजमेन्ट च्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस् पैकी एक आहेत. जुई जोशी यांची जगातील मोजक्या काही अतिशय सन्मानाने व संपुर्ण राजेशाही बंदोबस्तामध्ये वावरणार्‍या महिला उद्योजकांमध्ये गणती होते. […]

राजाभाऊ चितळे

मराठी माणसाकडे व्यावसायिक बुध्दी नाही किंवा त्याच्याकडे इतर ग्राहकांना आकर्षीत करण्यासाठी लागणारे संभाषण चातुर्य व व्यवसाय फोफावण्यासाठी लागणारी मेहेनती वृत्ती नाही अशा विधानांना छेद देणारे अनेक मराठी व्यावसायिक महाराष्ट्रात, भारतात, व जगात होवून गेले आहेत.

अतिशय उत्तम चव व दर्जा, रास्त किंमत, निरनिराळ्या सण समारंभांसाठी लागणार्‍या मिठाई, पक्वानांची व इतर पदार्थांची भरपुर रेलचेल, व टिकाऊपणा या मुलभूत वैशिष्ठांच्या जोरावर चितळे गृह्द्योगाने आपले नाव सर्वसामान्य नोकरदार माणसाच्या ह्रद्यावर कोरले आहे. कुठलाही सण असो वा कार्यक्रम, कुठे सहल जाणार असो किंवा अचानक पाहुणे येणार असोत, प्रत्येक मराठी माणसाची पाऊले ही आपसुकच चितळेंच्या दुकानाकडे वळतात. इतके वर्ष जपलेला घरगुतीपणा व त्याला दिलेला व्यावसायिकतेचा हळुवार स्पर्श ही चितळेंच्या मिठाईची खासियत.
[…]

गडकरी, नितीन जयराम

नितीन गडकरी हे उद्योजक, राजकीय नेते आणि भारतीय जनता पक्षाचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. […]

अच्युत पुरुषोत्तम कानविंदे

भारतातील नामांकित वास्तुशास्त्रज्ञ. अहमदाबादचे हरिवल्लभदास हाऊस, कानपूर आयआयटी आणि वाचनालय, दिल्लीचे नॅशनल सायन्स सेंटर, नेहरू सायन्स सेंटर, स्विस ट्रेड मिशन, मेहसाण्याची नॅशनल डेअरी बोर्डाची इमारत, बांगला देशातील ढाक्याची नॅशनल लायब्ररी इत्यादी इमारती ह्या त्यांच्या वास्तुकलेचे नमूने आहेत.
[…]

1 2 3 4 5