महाराष्ट्रात इतिहासात होऊन गेलेली व्यक्तिमत्त्वे. राजे-महाराजे, संस्थानिक, शिवकालीन आणि पेशवेकालीन व्यक्ती वगैरेंची माहिती…

फडणवीस, नाना

स्वातंत्र्यपूर्व काळातील त्यावेळचे हिदुस्थानचे गर्व्हनर जनरल वेलस्ली यांनी नाना फडणीसांचे वर्णन खालील शब्दात केले आहे. ते म्हणजे, ‘‘पेशवाईर्तील मुत्सद्दी नाना फडणीस म्हणजे मराठी राज्यातील शहाणपण आणि समतोल.’’ नाना फडणीस यांचे मूळ घराणे रत्नागिरी जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील. नानांचा जन्म १७४२ मध्ये सातारा येथे झाला. […]

टोपे, रामचंद्र (तात्या टोपे)

पांडुरंग टोपे यांच्या आठ अपत्यांपैकी तात्या हे दुसरे अपत्य. १८१४ मध्ये नाशिक जिल्ह्यातील येवला येथे जन्मलेल्या तात्या टोपे यांचे मूळ नाव रघुनाथ! रघुनाथचे वडील पेशव्यांकडे दानाध्यक्षाचे काम पाहण्यासाठी ब्रह्मावर्तास येऊन राहिले. पर्यायाने रघुनाथचे अर्थात तात्यांचे बालपण नानासाहेब पेशवे आणि राणी लक्ष्मीबाई यांच्यासोबत व्यतीत झाले.
[…]

राजमाता जिजाबाई (जिजाऊ)

महाराष्ट्राच्या इतिहासातील एक अत्यंत प्रभावी व्यक्तिमत्त्व म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई, राजमाता जिजाबाई. महाराजांना त्यांनी घडवलं आणि महाराष्ट्राचं बवितव्यच बदललं. जिजाऊ या सिंदखेडच्या लखुजी जाधवांच्या कन्या. जाधव हे देवगिरीच्या यादव घराण्याचे वंशज होते. इ.स. १६०५ […]

आंग्रे, कान्होजी

सरखेल कान्होजी आंग्रे मराठा साम्राज्याचे पहिले आरमारप्रमुख होते. यांनी ब्रिटिश, डच आणि पोर्तुगीज नाविक फौजांविरुद्ध लढा देऊन मराठा आरमाराचे नेतृत्व केले. कान्होजींचा जन्म अलिबाग येथे झाला. कान्होजींना इ.स. १६९८ साली मराठा सरखेल तथा आरमारप्रमुखपदी नेमण्यात […]

देशमुख, गोपाळ हरी

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
[…]

होळकर, अहिल्याबाई

अहिल्याबाई ही स्त्रियांमधील उत्तम राज्यकर्ती होती.” “अहिल्याबाईचे असामान्य कर्तुत्वाने तिच्या रयतेचे तिने मन जिंकले, तसेच मराठ्यांमधील नाना फडणवीस सकट सर्व उच्च धुरीणांचे.माळव्यातील लोकांनुसार ती एक दिव्य अवतार होती. ती आजतागायतची सर्वात शुद्ध व उदाहरण देण्याजोगी शासक होती.अलिकडच्या काळातील चरीत्रकार तिला ‘तत्वज्ञानी राणी’ असे संबोधतात.याचा संदर्भ बहुतेक ‘तत्वज्ञानी राजा’ भोज यासमवेत असु शकतो.
[…]

1 2