जोशी, पांडुरंग वामन

पांडुरंग वामन जोशी हे केज तालुक्यातील नांदूरघाट येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक होते. त्यांचे शिक्षण माजलगाव तालुक्यात झाले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात कार्यरत होते व त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघात दहा वर्षे काम केले. मराठवाडा मुक्तिसंग्राम लढ्यात त्यांनी […]

केळकर, नरसिंह चिंतामण

साहित्य व राजकारण क्षेत्रातील पुढारी, साहित्य सम्राट. लोकमान्य टिळकांचे उजवे हात असलेले न. चिं.  ऊर्फ तात्यासाहेब केळकर यांनी टिळकांच्या निधनानंतर तब्बल १२ वर्षे केसरीच्या संपादकपदाची धुरा वाहिली. 1921 साली बडोदे येथे भरलेल्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. समग्र केळकर ग्रंथमाला, निंबधकार, तोतयाचे बंड, मराठे आणि इंग्रज, सुभाषिते आणि विनोद […]

रानडे, (न्या.) महादेव गोविंद

निःस्पृह न्यायाधीश, उत्कृष्ट लेखक, चिकित्सक अभ्यासक, समाजसुधारक, उत्तम वक्ते, अर्थशास्त्रज्ञ, इतिहास विशारद असे ज्यांचे बहुआयामी व्यक्ति होते ते म्हणजे न्या. महादेव गोविंद रानडे. न्यायमूर्ती रानडे यांचा जन्म निफाड तालुक्यात १८ जानेवारी १८४२ रोजी झाला.
[…]

खेडगीकर,व्यंकटराव भवानराव

आत्मचरित्रकार आणि हैद्राबाद मुक्ती संग्रामाचे अग्रणी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वामी रामानंदतीर्थ तथा व्यंकटराव भवानराव खेडगीकर. स्वामी रामानंदतीर्थांचा जन्म १९०४ साली झाला.
[…]

पाटील, कावेरीताई

१९४२ सालच्या ऊठावावेळी जेव्हा सबंध भारत स्वातंत्राच्या चैतन्यमयी लाटांवर स्वार होण्याकरिता संघटीत झाला होता, त्यावेळी स्त्रियांचं योगदान बहुमूल्य होतं; अश्या आवर्जुन घेतल्या जाणार्‍या नावांपैकी एक नाव म्हणजे कावेरीताई पाटील. मोर्चे व सत्याग्रहांमधील सहभागामुळे कावेरीताईंना दोन […]

फडके, वासुदेव बळवंत

रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या वासुदेव बळवंत फडक्यांचे आजोबा कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले होते. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्यात वास्तव्यास आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.
[…]

देशमुख, गोपाळ हरी

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
[…]

सावरकर, विश्वासराव

स्वा. सावरकर- नेताजी सुभाषचंद भेट, स्वा. सावरकर- डॉ. बाबासाहेब आंबेडकर भेट, स्वा. सावरकर- गाडगे महाराज भेट, रत्नागिरी येथील पतितपावन मंदिराची स्थापना, स्वातंत्र्यवीरांचे दलितोद्धाराचे कार्य तसेच गांधीहत्येनंतर घडलेल्या अनेक घटना यांचे प्रत्यक्ष साक्षीदार असलेल्या विश्वासरावांनी बर्‍याच प्रमाणात लिखाणही केले आहे. ते एका मोठ्या, प्रदिर्घ व ऐतिहासीक कालखंडाचे महत्वपुर्ण व एकमेव साक्षीदार होते.

‘आठवणी अंगाराच्या’ या त्यांच्या पुस्तकातून त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाच्या विविध पैलूंवर प्रकाश टाकला. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या जीवनातील काही महत्त्वाचे क्षण टिपणारे त्यांचे हे पुस्तक चांगलेच गाजले होते.
[…]

साठे, अण्णाभाऊ

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.
[…]

1 2 3 4