शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार्‍यांची माहिती

आत्माराम रावजी देशपांडे (कवी अनिल)

आत्माराम रावजी देशपांडे हे मराठी कवी होते. ते कवी अनिल या टोपण नावाने प्रसिद्ध होते. कवि अनिलांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी – १० चरणांची कविता – हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. […]

कामत, (डॉ.) वसुधा

शिक्षणक्षेत्रात भरीव कामगिरी करणारी योग्य व्यक्ती आहे. मूळच्या पुण्याच्या असणाऱ्या डॉ. कामत यांची वाटचाल कौतुकास्पद आहे.
[…]

राजूरकर, (डॉ.) न. गो.

न. गो. राजूरकर यांची म्हणावी तशी ओळख झाली नाही. ते हैदराबादचे रहिवासी असल्यामुळे कदाचित हे झाले असावे किंवा त्यांची बरीचशी ग्रंथसंपदा इंग्रजीत असल्यामुळे हे झाले असावे. डॉ. राजूरकर हे ख्यातनाम लेखक व वक्ते आहेत. त्यांनी इंग्रजीत आठ तर मराठीत पाच ग्रंथ लिहिले आहेत.
[…]

कुलकर्णी, (डॉ.) वा.म.

डॉ. वा. म. कुलकर्णी त्यांनी संस्कृतचे प्राध्यापक, महाराष्ट्र राज्य भाषा संचालनालयाचे संचालक, एशियाटिक सोसायटीच्या म. म. पां. वा. काणे इन्स्टिट्यूटचे संचालक तसेच एशियाटिक सोसायटीच्या वाषिर्क जर्नलचे प्रमुख संपादक अशी अनेक महनीय पदे भूषवली होती. तरीही त्यांच्या उपजत ऋजुतेमुळे तसेच भिडस्त स्वभावामुळे ते प्रसिद्धीच्या झोतापासून कायम दूर राहिले
[…]

प्रमोद व्यंकटेश महाजन

स्व. प्रमोद व्यंकटेश महाजन हे भारतीय जनता पक्षातील (भाजप) दुसर्‍या पिढीतील महत्त्वाचे नेते होते. भारताच्या पंतप्रधानपदावर जाण्याची योग्यता असलेला अलिकडच्या काळातील एकमेव मराठी नेता अशी त्यांची प्रतिमा होती.
[…]

केळकर, चंद्रकांत

चंद्रकांत केळकरांचा पेशा शिक्षकाचा असला तरी, त्यांचा पिंड सक्रिय कार्यकर्त्याचा राहिलेला आहे. गेली तीस-चाळीस वर्षे त्यांनी केलेलं परिवर्तनाच्या चळवळीतील लिखाण, संघटन कौशल्य, चळवळीतील कृतिशीलता अशा चौफेर वाटचालीची दखल घ्यायालाच हवी . […]

फडके, अरुण

अरूण फडके हे ठाण्यामधील नावाजलेले शब्दकोशकार व व्याकरणतज्ज्ञ आहेत. […]

जोशी, गजानन दत्तात्रय

हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेचे पार्ल्यातील भाऊबीज कार्यकर्ते गजानन दत्तात्रय जोशी यांचा सुमारे ३६ वर्षांपूर्वी महर्षी कर्वे यांच्या हिंगणे स्त्री शिक्षण संस्थेशी त्यांचा संबंध आला.
[…]

कर्वे, धोंडो केशव

विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ समाजसुधारक, महिला सबलीकरणासाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचणारे धोंडो केशव उर्फ अण्णा साहेब उर्फ महर्षी कर्वे यांचा जन्म ८ एप्रिल १८५८ ला कोकणातील मुरुड या गावी झाला. शालेय शिक्षण मुरुड आणि रत्नागिरी येथे पूर्ण झाल्यावर एलफिनस्टन महाविद्यालयातून गणित विषय निवडून पदवी पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलं. […]

रामकृष्ण गोपाळ भांडारकर

प्राच्यविद्या संशोधनात त्यांना रस होता. १८७४ साली लंडन येथे आणि १८८६ साली व्हिएन्ना येथील प्राच्य विद्या परिषदात त्यांनी निबंध वाचले होते. ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. […]

1 7 8 9 10 11 12