शिक्षणक्षेत्रात काम करणार्‍या आणि शिक्षण क्षेत्रासाठी काम करणार्‍यांची माहिती

सत्येन कुलाबकर

MBA, HRD विद्याविभूषत सत्येन वयाच्या १८ व्या वर्षापासून रस्ते वहातुक सुरक्षा कार्यात काम करत आहेत. शालेय विद्यार्थ्यांना वहातुकीचे सुरक्षा नियम व पालन शिकण्यावर त्यांचा विशेष भर असून वहातूक पोलीस कार्यालय आयोजित शंभराहून अधिक शिबीरांद्वारे अंदाजे १०००० विद्यार्थ्यांना त्यांनी मार्गदर्शन केले आहे. […]

मेघश्याम पुंडलिक रेगे

भारतीय आणि पाश्चात्त्य या दोन्ही तत्त्वज्ञानांचा त्यांचा चांगला अभ्यास होता. या दोन्ही विचारपरंपरांची अतिशय साधार, स्पष्ट आणि विश्लेषणात्मक मांडणी करण्याचे त्यांचे कौशल्य वादातीत होते. रेगे यांच्याविषयी महाराष्ट्रातील लेखन-वाचन व्यवसायाशी निगडित असलेल्या अनेकांना नितांत आदर आणि कुतूहल असते. […]

पं. नारायणराव बोडस

त्यांनी सं. सौभद्रम्, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद, सं. संशयकल्लोळ, सं. धडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकात अविस्मरणीय व गाजलेल्या भूमिका केल्या. […]

देवदत्त दाभोलकर

शिक्षणक्षेत्रात मुलगामी विचार मांडणारे दाभोलकर हे स्वातंत्र्योत्तर सामाजिक परिवर्तनाच्या चळवळीतील बिनीचे शिलेदार म्हणून ओळखले जात असत. […]

डॉ. विनायक विश्वनाथ पेंडसे ऊर्फ अप्पा पेंडसे

अप्पा पेंडसे हे लाला लजपत राय यांच्या स्काउट दलात होते, भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या मुक्तेश्वर दलात १९३० मधे ते सामील झाले. १९३२ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघात आले. […]

डॉ. अरुण निगवेकर

माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी निगवेकर यांचा उल्लेख ‘फादर ऑफ क्वलिटी एज्युकेशन इन इंडिया’ असा केला होता. युजेसीचे माजी अध्यक्ष, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू यांसारखी पदे त्यांनी भूषविली. […]

केशव विष्णू बेलसरे

त्यांनी पन्नास वर्षांहून अधिक काळ नामस्मरणाच्या शास्त्रशुद्ध अभ्यासात घालवून स्थूल देहबुद्धीतून सूक्ष्म आत्मबुद्धीत शिरण्याचा समजून अभ्यास केला होता आणि सामान्यजनांना त्याचं महत्त्व समजावून सांगण्यासाठी त्यांनी ‘नामसमाधी सहजसमाधी’ हा ग्रंथ लिहिला. […]

कृष्णदेव मुळगुंद

मुळगंद यांच्या कलासाधनेची दखल समाजानेही घेतलेली आहे. कलाछाया पुरस्कार, कलागौरव पुरस्कार, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती पुरस्कार, कलारत्न पुरस्कार, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचा रंगकर्मी पुरस्कार, कै. राजा मंत्री पुरस्कार, कै. मधू आपटे पुरस्कार असे अनेक पुरस्कार त्यांना लाभले. […]

1 2 3 12