देश-विदेशातील कॉर्पोरेट जगतात अधिराज्य गाजवणारे मराठी अधिकारी..

गायकवाड, संजय शंकर

संजय गायकवाड हे फिल्मी रिळांऐवजी देशभरातील सिनेमागृहात थेट सॅटेलाईटद्वारे प्रक्षेपण दाखविण्याच्या पद्धतीची सुरुवात करणाऱ्या यूएफओ या कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. व्हॅल्युएबल ग्रुपच्या माद्यमातून त्यांनी ऑनलाईन शिक्षण क्षेत्रातही मोठी क्रांती घडवून आणली आहे.      

तळेकर, गंगाराम

कुशल संघटन कौशल्य आणि हजरजबाबीपणा या गुणांवर कॉर्पोरेट जगताला मॅनेटमेंटचे धडे देणारे आणि मुंबईतल्या प्रसिध्द अश्या डबेवाला संघटनेचे अध्यक्ष असलेले गंगाराम तळेकर हे मूळचे पुणे जिल्ह्यातील गडद येथील. […]

खंडकर, स्वाती

“कला” व व्यवस्थापन ही तर दोन टोकाची क्षेत्र. या दोन्ही क्षेत्रात अनोखा ठसा, त्यात ही वेगळेपण करुन ते टिकवणारी फारच कमी मंडळी आपल्याला पहायला मिळतात, असंच “सदा उल्हासित व्यक्तिमत्व स्वाती खंडकर”
[…]

जाधव, किरण

रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. आय. टी., विज्ञान, तंत्रज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्‍या असंख्य हिर्‍यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण.
[…]

वेलणकर, वरूण

वरूण वेलणकर हे पुण्याचे रहिवासी असून व्हाईट कॉपर एन्टरटेंमेंट या मार्केटिंग क्षेत्रात जगप्रसिध्द असलेल्या कंपनीमध्ये ते मानाच्या हुद्यावर काम करीत आहेत. वरुण हे त्यांच्या उत्तम तंत्रशुध्दपणाबद्दल तसेच कोणत्याही गोष्टीची प्रभावी जाहिरात करण्यासाठी त्यांना अवगत असलेल्या मार्केटिंग कसबांसाठी प्रसिध्द आहेत. कोणत्याही खेळाचा मोठा एव्हेन्ट असो किंवा बाजारात नव्याने आलेल्या एखाद्या खाद्यपदार्थाची किंवा सौंदर्यप्रसाधनाची जहिरात अथवा प्रसिध्दी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या दिवशी फलके, बोर्ड, मोठे होर्डिंग्स, आकर्षकरित्या व सुबकपणे डिझाईन करणे (सजविणे) व कमीत कमी शब्दांत आपला संदेश जास्तीत जास्त कलात्मकतेने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे मोठ्या कल्पनाशक्तीचे काम असते.
[…]

आहिरे, संकेत

संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे.
[…]

कुंभार, भुपेश

भुपेश कुंभार हे भारताच्या गळ्यात सजणार्‍या तंत्रज्ञानाच्या माळेतील लकलकते मणी आहेत, व तंत्रज्ञान विकासाला विशेषतः गाड्या बनविण्याच्या गुंतागुंतीच्या क्षेत्रातील क्रांतीप्रती त्यांनी दिलेले योगदान अद्वितीयच मानले पाहिजे. सल्ला-मसलत हा त्यांचा आवडीचा प्रांत असल्यामुळे ते सध्या बजाज ऑटो लिमीटेड या नावाजलेल्या कंपनी क्षेत्रातील सर्व सल्ला मसलतींचे काम व ग्राहकांना आपल्या परिवारात खेचुन घेण्याचे काम मोठ्या निष्ठेने करीत आहेत.
[…]

जोशी, जुई

जुई जोशी ह्या फिलान्थ्रोपिक एन्गेजमेन्ट च्या बोर्ड ऑफ डिरेक्टरस् पैकी एक आहेत. जुई जोशी यांची जगातील मोजक्या काही अतिशय सन्मानाने व संपुर्ण राजेशाही बंदोबस्तामध्ये वावरणार्‍या महिला उद्योजकांमध्ये गणती होते. […]

टिळक, चन्द्रशेखर मोरेश्वर

चन्द्रशेखर टिळक हे नॅशनल सिक्युरिटी डिपॉझिटरी लिमिटेडमध्ये (एनएसडीएल) कार्यकारी उपाध्यक्ष म्हणून काम पाहतात. गेली १३ वर्षे ते ‘एनएसडीएल’मध्ये कार्यरत आहेत, त्याशिवाय त्यांनी मुंबई शेअर बाजारात ८ वर्षे, सेबीमध्ये २ वर्षे आणि इंडसेकमध्ये २ वर्षे अशी गुंतवणूक क्षेत्रांशी संबंधीत नोकरी केली आहे. १ एप्रिल १९९२ साली त्यांची सेबीवर प्रतिनियुक्ती झाली. भारतीय स्टॉक एक्स्चेंजेसमधुन प्रतिनियुक्तीवर जाणारे सर्वात तरूण आणि पहिले महाराष्ट्रीय अधिकारी आहे. अनेक अर्थिक घोटाळ्यांची त्यांनी तपासणी अधिकारी म्हणून तपासणी केली आहे.
[…]