मोहन दाते

१९९५ साली धुंडीराजशास्त्रींचे निधन झाल्यानंतर ‘दाते पंचांग’ चालविण्याची जबाबदारी मोहनराव दाते यांच्यावर पडली. तेव्हापासून आतापर्यंत मोहनराव ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत हे दाते पंचांगाच्या लोकप्रियतेवरून दिसून येतच आहे. […]

मोरेश्वर घैसास गुरुजी

मोरेश्वर घैसास गुरुजी यांचे वडील प्रसिद्ध ऋग्वेदी, घनपाठी वेदमहर्षी विनायकभट्ट हरिभट्ट गुरुजी यांनी आपल्या पुढील पिढीलाही वेदांच्या अध्ययनाचा वारसा दिला पाहिजे, या विचारातून त्यांनी पुण्यात राहण्याचे निश्चित केले. सदाशिव पेठेत स्वतःच्या राहत्या खोलीत त्यांनी वेदपाठशाळा सुरू केली. दोन विद्यार्थ्यांना घेऊन १५ ऑक्टोबर १९४५ मध्ये त्यांचे अध्यापन सुरू केले. […]

पंडित धुंडिराजशास्त्री ऊर्फ अण्णा लक्ष्मण दाते

महाराष्ट्रात ‘पंचांग म्हणजे दाते पंचांग’ हे समीकरण झाले आहे. याचा परिणाम म्हणून भारत सरकारने कॅलेंडर रिफॉर्म कमिटीवर अण्णा दाते यांना सदस्य करून घेतले. […]

नितीन ढेपे

नितीन ढेपे यांना ह्या संकल्पनेचे पेटंट देखील १४ जानेवारी २०१६ रोजी भारत सरकारकडून मिळाले असून ही वास्तू सर्वा्थाने लोकांच्या पसंतीस उतरली आहे. भारतीय पारंपरिक खेळ, खाद्यपदार्थ, पेहराव तसेच विविध कला आणि संस्कृती जोपासण्याचे काम करणाऱ्या ‘ढेपे वाडा’ या वास्तूला भारत सरकारकडून २०१९ मध्ये बौद्धिक स्वामीत्व हक्क मिळाले आहेत. […]

राष्ट्रीय कीर्तन केसरी गोविंदस्वामी आफळे

सिनेमा, रेडीओ, टी.व्ही. अश्या विविध माध्यमांमुळे कीर्तन हा प्रकार थोडा मागे पडू लागला होता. त्यात आफळे बुवांनी नवचैतन्य निर्माण केले. क्षणात हास्याचा खळखळाट तर क्षणात वीरश्री, गहिवर दाटेल असा करूण रस तर मिश्कील कोट्या अशाप्रकारे नवरसांचा उत्कट अविष्कार त्यांच्या कीर्तनातून होत असे. […]

अजित प्रधान

अजित प्रधानांकडे प्रामुख्याने १९८०पर्यंतच्या हिंदी चित्रपट संगीताचा संग्रह आहे. शंकर-जयकिशन आणि ओ. पी. नय्यर या दोन संगीतकारांचं जवळजवळ सगळं कलेक्शन त्यांच्याकडे आहे. त्याशिवाय सी. रामचंद्र, एस. डी. बर्मन आणि त्या काळातल्या बहुतेक सगळ्या संगीतकारांच्या रेकॉर्ड्स त्यांच्या खजिन्यात आहेत. […]

यशवंत देव

भावगीताच्या विश्वातील तळपता तारा म्हणून ज्या मोजक्या संगीतकारांची नावे घ्यावी लागतील, त्यामध्ये यशवंत देव यांचे नाव फार वरचे आहे. त्यांची कितीतरी गाणी आजही ऐकताना मन आनंदाने भरून जाते. स्वत: उत्तम कवी असल्याने त्यांनी संगीतकार म्हणून केलेली कामगिरी अधिक उठावदार आहे. […]

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे

प्रा. डॉ. प्रकाश खांडगे हे लोकसाहित्याचे अभ्यासक, पत्रकार व लेखक आहेत. प्रा. प्रकाश खांडगे हे मुंबई विद्यापीठातील लोककला अकादमीचे समन्वयक आहेत. […]

प्रा. नितीन आरेकर

नीतिन आरेकर हे मराठीचे प्राध्यापक असून ते उल्हासनगर येथील चांदीबाई कॉलेजमध्ये मराठीचे विभागप्रमुख आहेत. […]

कुलकर्णी, मनोहर

वेगवेगळे कार्यक्रम, भव्य स्टेज शो आदींच्या व्यवस्थापनासाठी हल्ली ‘इव्हेंट मॅनेजर’ कार्यरत असतो. पुण्याच्या ‘मनोरंजन’ संस्थेचे मनोहर कुलकर्णी हे याच प्रकारचे कार्य गेल्या पाच दशकांहून अधिक काळ करीत आहेत. आजच्या काळाचा निकष लावल्यास कुलकर्णी हे मोठे ‘इव्हेंट मॅनेजर’ ठरतात. त्यांच्या या कार्याची, त्यांनी निरलसपणे व तत्परपणे केलेल्या सेवेची दखल नाट्य परिषदेच्या पुणे शाखेने घेतली असून, त्यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला आहे.
[…]

1 2