आपटे, बळवंत

Apte, Balwant

सार्वजनिक जीवनात किंवा अगदी व्यक्तिगत आयुष्यातही, अनेकदा अनेक समस्या समोर उभ्या ठाकतात. त्याची उत्तरे शोधताना किंवा समस्येतून बाहेर पडताना एकटे मन पुरे पडत नाही. मनात संभ्रम माजतो, निर्णयशक्ती कुंठित होते. अशा वेळी, मानसिक आधाराची गरज तीव्रपणे भासू लागते. राजकारणात वावरणाऱ्यांना अनेकवार अशा मन:स्थितीला सामोरे जावे लागते. पण त्यांना हा संभ्रम व्यक्त करता येत नाही, आणि मनात दाबूनही ठेवता येत नाही. एखादा विश्वासू सुहृद सोबत असावा असे अशाच वेळी तीव्रतेने वाटू लागते. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिवारातील लहानथोर कार्यकर्त्यांना असा सुहृद लाभला होता, भाजपचे ज्येष्ठ नेते, संघाचे कट्टर कार्यकर्ते आणि संघ परिवाराच्या ‘थिंक टँक’मध्ये महत्त्वाची भूमिका बजावणारे अ‍ॅडव्होकेट प्रा. बाळ आपटे यांच्या रुपाने.

संघ, भाजप, विश्व हिंदू परिषद, विद्यार्थी परिषद किंवा वनवासी कल्याण आश्रम, बाळ आपटे यांचा या सर्वानाच एक आगळा आधार होता. कारण बाळ आपटे हा आपला, व्यक्तिगत ‘फ्रेंड, फिलॉसॉफर आणि गाइड’ आहे, असा अनुभव त्या प्रत्येकालाच समस्यांचा सामना करतानाच्या काळात कधी ना कधी आलेला असे.

राष्ट्रउभारणीच्या कामात असलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या आचरणाला आवश्यक असलेली शिस्त बाळासाहेबांनी स्वत:च्या अंगी प्रयत्नपूर्वक बाणवलीच, पण तशीच शिस्त दुसऱ्या प्रत्येकाच्या अंगी असावी यासाठीही ते ठाम आग्रही राहिले. म्हणूनच बाळ आपटे यांचा संघ परिवारात विलक्षण आदरयुक्त दबदबा होता. विशुद्ध राष्ट्रप्रेम हाच जीवनाचा मूलमंत्र आहे, त्याच्यासाठीच जगायचे, आणि त्यासाठीच मरण पत्करायलाही सिद्ध राहायचे, ही वैचारिक बैठक असलेले एक समर्पित जीवन म्हणून संघ परिवारातच नव्हे, तर त्यांच्या कार्यक्षेत्रातील प्रत्येकालाच बाळासाहेबांच्या नसण्याची उणीव सतत भासत राहील. परिवाराच्या कामासाठी आणि हिंदू समाजाच्या उन्नतीसाठी समर्पित असलेले एक जीवन काळाआड गेले, अशी संघ परिवारातील प्रत्येकाच्याच मनातील भावना सरसंघचालक मोहन भागवत यांनी त्यांच्या निधनानंतर व्यक्त केली.

## Apte, Balwant

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*