चंद्रकांत सखाराम चव्हाण (बाबूराव अर्नाळकर)

लेखक

आर्थर कॉननडॉइल, अ‍ॅगाथा ख्रिस्ती, अर्लस्टॅनले गार्डनर हे रहस्यकथा लेखक बहुतेकांच्या परिचयातले. पण ज्यांना इंग्रजी भाषा परिचित त्यांनाच त्यांचा परिचय. मात्र, इंग्रजीतलं हे सोनं मराठीत आणण्याचं १०० टक्के कठीण काम यशस्वी करणारे एकमेव लेखक म्हणजे बाबूराव अर्नाळकर.   त्यांचे मूळ नाव चंद्रकांत सखाराम चव्हाण.

बाबूरावांचे कथा नायक-नायिका अर्नाळकरांनी त्या वेळी धनंजयमाला, झुंजारमाला, जयहिंदमाला, प्रफुल्लमाला, यौवनमाला अशा माला सुरू करून त्यातून दरमहा पाच-सहा कथा लिहिल्या.

त्यांची पहिली रहस्य कादंबरी त्यांनी वयाच्या ३७ व्या वर्षी १९४६ मध्ये लिहिली. तिचं नाव होतं ‘चौकटची राणी’ या कादंबरीनं वाचकांना अक्षरश: वेड लावलं. १९३६ ते ८४ या काळात त्यांनी १०९२ रहस्यकथा लिहिल्या. याची नोंद गिनिज बुकात घेतली गेली.

२०१४ मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी झाली. त्यावेळी त्यांच्या अनेक रहस्यकथा `मनोरमा प्रकाशन’ तर्फे पुनर्प्रकाशित झाल्या.

४ जुलै १९९६ रोजी बाबूराव अर्नाळकर यांचे निधन झाले.

विकिपिडियावरील माहितीचे पान 

बाबुराव अर्नाळकर यांची अधिक माहिती 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.

# Chandrakant Sakharam Chavhan alias Baburav Arnalkar
# चंद्रकांत सखाराम चव्हाण ( बाबूराव अर्नाळकर )

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*