आंबेकर, आर्या

आर्या ही मराठी गायिका आहे. झी मराठी वाहिनीच्या सारेगमप लिटिल चँप्स या संगीत विषयक कार्यक्रमात ती एक स्पर्धक म्हणून सहभागी झाली होती. जन्म नागपुरामध्ये समीर आणि श्रुती आंबेकर या मराठी दांपत्याच्या घरी झाला. आर्येचे वडील समीर हे डॉक्टर असून आई श्रुती गायिका आहे. आर्या आपल्या आईकडूनच गायनाचे शिक्षण घेत आहे.

आर्येची आजीसुद्धा एक शास्त्रीय गायिका होती आणि तिने आर्या जेमतेम २ वर्षाची असतानाच तिचे गायनातले कौशल्य ओळखले. आर्या साडेपाच वर्षाची असताना तिने आपल्या आईकडे शास्त्रीय गायनाचे धडे गिरवण्यास सुरुवात केली. वयाच्या सहाव्या वर्षी तिने संगीताची पहिली परीक्षा दिली.

तिसरीत असताना आर्येने आंतरशालेय गायनाच्या स्पर्धेत भाग घेतला आणि आपल्या शाळेला पहिले पारितोषिक मिळवून दिले होते. त्यानंतर तिने पुन्हा मागे वळून पाहिले नाही. आर्येने आतापर्यंत अनेक मराठी/हिंदी अल्बम्स तसेच काही मराठी चित्रपटामध्ये गाणी गायली आहेत.

## Arya Ambekar

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*