दातार, अरविंद

ठाणे जिल्ह्यातील प्रसिध्द वृत्तपत्र वितरक व्यावसायिक अशी ख्याती असलेल्या अरविंद दातार यांचं वितरण कार्य मुंबई ते बदलापूर, चर्चगेट ते विरार, कल्याण ते कसारा, भिवंडी, नवी मुंबई अश्या परिक्षेत्रांत आहे. आदित्य असोसिएट्सचे व अश्विनी पब्लिसिटीचे ते संचालक असून अनेक सामाजिक संस्थांचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषविले आहे

अरविंद दातार ह्यांचे वडिल अच्युत दातार हे वयाच्या १३व्या वर्षी आपले मुळगाव पनवेल तालुक्यातील वावंजेपाला येथून ठाणे शहरात उदरनिर्वाहासाठी आले. ते त.र.पुरोहित यांच्याकडे वृत्तपत्र वाटण्यासाठी नोकरीला लागले. त्यांची इनामदारी व कामकाज पाहून पुरोहित यांनी त्यांचा व्यवसाय अच्युत दातार यांच्याकडे सोपविला आणि वडिलांचा हा व्यवसाय आता त्यांचे दोन सुपुत्र अरविंद दातार आणि अरूण दातार समर्थपणे सांभाळत त्याला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाली आहे.

अरविंद दातार यांची ही सामाजिक तळमळ पाहून मिलिंद बल्लाळ यांनी त्याना ठाण्यामध्ये सुरू झालेल्या चौथ्या रोटरी क्लबच्या सदस्य पदासाठी निमंत्रण दिले. रोटरीमध्ये अनेक महत्त्वाची पदे भुषवित ते २०११-२०१२ या वर्षासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचे अध्यक्ष झाले.

अरविंद दातार यांनी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनच्या माध्यमातून वाडा, मोखाडा, जव्हार या परिसरात चेकडॅमद्वारे पाणी साठवून अनेक शेतकर्‍यांना लाभ मिळवून दिला. वाडा येथे तत्कालीन अध्यक्ष संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दातार यांनी शाळा दत्तक घेतली. रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनचा अध्यक्ष पदाचा पदभार स्विकारताच डिस्ट्रिक्ट गव्हर्नर विजय जालन यांच्या मार्गदर्शनाखाली ठाण्यात झाडे लावण्याचा विक्रम केला होता.

दैनिक गावकरी च्या पुरवणीवरुन संपादित

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*