फुलफगर, योगेश

योगेश फुलफगर यांचा जन्म १८जानेवारी १९८५ रोजी पुणे येथे झाला. टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, येथे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी दिग्दर्शन क्षेत्रात अनेक नवे प्रयोग करण्यास सुरूवात केली. त्यांच्यामधील सतत नव्या व तजेलदार विषयांवर चित्रपट बनविण्यास आसुसलेल्या, व चित्रपट क्षेत्रातुन नवीन संवेदनशील चित्रपटांची नांदी आणण्यास तयार असलेल्या या प्रतिभावान दिग्दर्शकाची दखल हिंदी चित्रपटसृष्टीने घेतली. आज संजय लीला भन्साळी फिल्म्स प्रायव्हेट लिमीटेड, या रत्नपारखी संस्थेशी व त्या संस्थेमार्फत निर्माण केलेल्या प्रत्येक दर्जेदार चित्रपटात त्यांचे देखील अमुल्य योगदान असते. या कंपनीत साहाय्यक दिग्दर्शकाची भुमिका चोख बजावताना, त्यांनी रसिकांना प्रयोगशीलतेच्या व गुणवत्तेच्या बाबतीत कधीच निराश केले नाहीये.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*