जगताप-वराडकर, मिताली

रंगभूमी, दूरचित्रवाणी, जाहिराती, रुपेरी पडदा अशा विविवध माध्यमातून आपल्या अभिनयाची चुणूक दाखवून थेट राष्ट्रीय पुरस्कारावर सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा बहुमान मिळवणारी अष्टपैलू अभिनेत्री मिताली जगताप वराडकर.

नांदेड जिल्ह्यात जमलेल्या मितालीचं शालेय शिक्षण औरंगाबादच्या “शारदा मंदीर कन्या प्रशाळेत तर वसंतराव नाईक महाविद्यालयातून “कला शाखेचं शिक्षण पूर्ण झालं, वडिल साहित्यिक आणि आईला कलेची मनापासून आवड असल्यानं मीतालीच्या सुप्त गुणांना वाव, प्रगल्भता आणि परिपक्वतेचे संस्कार मिळत गेले. नृत्याची आवड असल्या कारणानं “भरतनाट्यम्” या नृत्य प्रकाराचे प्रशिक्षण घेतले. सिंगापुर तसंच कारणानं “भरतनाट्यम्” या नृत्यप्रकारचे प्रशिक्षण घेतले. सिंगापुर तसंच मलेशिया मध्ये आपले नृत्य कौशल्य सादर करण्याची संधी मिताली जगतापला मिळाली. तिसरीत असतानाच त्यांचे नृत्य पाहून देवकी नावाच्या चित्रपटात त्यांनी छोटीशी भूमिका ही साकारली होती. पण काही कारणास्तव हा चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही. मिताली जगतापला लहानपणापासून अभिनयाची विशेष आवड असल्यानं अभिनयाची सुरुवात वेगळ्या विषयांच्या एकांकिका पासून केली. आपलं महाविद्यालयीन शिक्षण सुरु असतानाच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठातनं नाट्यशास्त्राचा १ वर्षाचा अभ्यासक्रम ही पूर्ण केला, दरम्यानच्या काळात अनेक नाटकं औरंगाबाद मध्ये असताना केली. पण व्यावसायिक अभिनय करायचा असेल तर मुंबई शिवाय पर्याय नाही हे जाणून आई वडिलांच्या पाठिंब्यावर मिताली जगतापनं मुंबईची वाट धरली. निघताना आई-वडिलांच मिताली ला एकच सांगणं होतं की “स्मीता पाटील सारखी हो.”

मुंबापुरी गाठल्यानंतर काही नाट्य वेड्या तसंच हौशी कलाकारां समवेत “अश्वथ” ही नाट्यसंस्था सुरु केली व त्या अंतर्गत बसवलेली नाटके पृथ्वी थिएटर मध्ये सादर केली जाऊ लागली. तीच्या प्रायोगिक नाटकांची सुरुवात “नो एक्सिट” या हिंदी नाटकातून सुरु झाली. त्यापाठोपाठ “अविष्कार” साठी “इंदू काळे” “सरला भोळे” अशी वेगळी नाटके करण्याची संधी तीला मिळाली.

मालिका, जाहिरात, चित्रपटात काम करण्याच्या संधीच्या शोधात असताना मराठी सिनेमासाठी पहिला ब्रेक ठरला तो २००० साली प्रदर्शित झालेल्या “राजू” च्या रुपानं या सिनेमासाठी मिताली जगताप ला राज्य शासनाचा पदार्पणातील सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला.

त्यानंतर दूरचित्रवाणी मालिकांमधून मिताली जगताप नं बालाजी टेलिफिल्म्सच्या “कुसुम”, “कली रे” या मालिकांमधून अविस्मरणीय भूमिका साकारल्या. त्यासोबतच “हकीगत”, “कामगार”, “कगार”, “सी.आय.डी.”, “मायलेक”, “पिंपळपान”, “टिकल तए पॉलिटिकल”, “वादळवाट”, “कुलवधू”, “आकाश पेलताना”, “एक धागा सुखाचा”, “असावा सुंदर स्वप्नांचा बंगला” सारख्या मराठी-हिंदी मालिकांमधून मिताली जगतापनी भूमिका साकारत, अभिनेत्री म्हणून ही प्रेक्षकांच्या मनावर प्रभाव पाडला. त्यासोबतच सखी या कथाबाह्य मालिकेच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी समर्थपणे पेलली.

तर “आग” आणि “विठ्ठल” सारख्या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटात लक्षात राहण्याजोगी भूमिका साकारली.

२००६ मध्ये विवाहबध्द झाल्यानंतरही चित्रपटांसाठी काही काळ तीनं ब्रेक घेतला. पण अभिनयातून निवृत्ती स्विकारली नाही अशातच “राजेश पिंजाणी” यांनी “बाबू बॅंड बाजा” या चित्रपटासाठी आईच्या भूमिकेसाठी मितालीची विचारणा केली होती. यात अनेक कंगोरे आणि आव्हानात्मक होती. पण अतिशय साधी असलेली भूमिका तीने ताकदीने स्वाकारली. सोशिक बायको, मुलाच्या शिक्षणासाठी आणि कुटुंबासाठी धडपडणारी आई पडद्यावर अगदी परिपूर्णतेने व्यक्त केली. पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात हा चित्रपट दाखवण्यात आला, तसंच ४८ व्या राज्य पुरस्कारासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचे नामांकन मिताली जगताप ना मिळालं. परंतु तो पुरस्कार हुकला, पण मानाच्या मानला जाणार्‍या “राष्ट्रीय पुरस्कारा” साठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मिताली जगताप-वराडकर ची निवड झाली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*