डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी

भारतातील पहिल्या महिला डॉक्टर

आनंदीबाई जोशी यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी ठाण्यात झाला. आनंदीबाईंचे पूर्वाश्रमीचे नाव यमुना होते. वयाच्या नवव्या वर्षी बालपणातच त्यांचा विवाह वयाने खुप थोरले असणार्‍या गोपालराव जोशी यांच्या सोबत झाला. लग्नानंतर गोपालरावानि आपल्या पत्नीचे जुने नाव यमुना हे बदलून आनंदीबाई असे ठेवले .

गोपालराव कल्याण ला पोस्टल क्लर्क होते. ते स्वतः लोकहितवादी ची शतपत्रे वाचत . आपल्या पत्नीला शिक्षणात रस आहे हे गोपालरावांनी जाणले होते . लोकहितवादी च्या शतपत्रातून ते प्रेरित झाले आणि आपल्या पत्नीस इंग्रजी शिकविण्याचा निश्चय केला.
लग्नानंतर आनंदीबाईंनी वयाच्या १४व्या वर्षी एका मुलास जन्म दिला. परन्तु दुर्दैवाने पुरेशी वैद्यकीय सुविधा न मिळाल्याने तो केवल १० च दिवस जगु शकला . हीच खंत आनंदीबाईना वैद्यकीय शिक्षणाकडे खेचून घेण्यास कारणीभूत ठरली . त्यांनी शिकून डॉक्टर होण्याचा निर्णय घेतला.
गोपालरावांनी यासंदर्भात अमेरिकेत काही पत्रव्यवहार केला. परंतु हे शिक्षण घेण्यासाठी ख्रिस्त धर्म स्वीकारण्याची अट होती आणि धर्मांतर करणे तर या जोडप्यास मान्य नव्हते. मात्र त्यांनी प्रयत्न सोडले नाहीत . पुढे आनंदीबाईची तळमळ आणि गोपालरावांची चिकाटी यांचे फलित त्यांना भेटलेच.
या दोघांना अपेक्षित असेच घडले आणि आनंदीबाईना ख्रिस्त धर्म न स्वीकारता १८८३ मध्ये वयाच्या एकोणिसाव्या वर्षी “वुमेन्स मेडिकल कॉलेज ऑफ़ पेंसिलवानिया” मध्ये प्रवेश मिळाला. दरम्यान, नविन वातावरण आणि प्रवासातील दगदग या मुळे आनंदीबाईची प्रकृती खुप ढासळली होती. परंतु अमेरिकेतील एका जोडप्याच्या मदतीमुळे सर्व काही सुरळीत होत गेले.
सुरुवातीला तत्कालीन समाजाकडून या कामाला खुप विरोध केला . आनंदीबाईनी कलकत्त्यामध्ये एक भाषण केले. तेव्हा त्यांनी भारतामध्ये महिला डॉक्टरांची किती आवश्यकता आहे हे पटवून दिले आणि हे स्पष्ट सांगितले की, मला यासाठी धर्मांतर वगैरे करण्याची काही गरज नाही . मी माझा हिन्दुधर्म , संस्कृती यांचा कदापी त्याग करणार नाही.
मला माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर भारतात येउन महिलांसाठी एक वैद्यकीय महाविद्यालय सुरु करायचे आहे . आनंदीबाईचे हे भाषण खुप लोकप्रिय झाले . त्यामुळे त्यांना होणारा विरोध तर कमी झालाच पण त्यांना या कार्यात हातभार म्हणून सबंध भारतातून आर्थिक मदत जमा झाली. भारताचे तत्कालीन व्हाइसरॉय यांनी पण २०० रुपयांचा फंड जाहिर केला.
कष्टाच्या आणि जिद्दीच्या जोरावर अभ्यासक्रम पुरा करून मार्च १८८६ मध्ये आनंदीबाईना एम् डी ची पदवी मिळाली. एम् डी साठी त्यांनी जो प्रबंध सादर केला त्याचा विषय होता, ‘हिंदू आर्य लोकांमधील प्रसूतिशास्त्र’.एम् डी झाल्यावर राणी विक्टोरियाकडून ही त्यांचे अभिनंदन झाले . हा खडतर प्रवास करताना गोपालरावांचा वृक्षासारखा आधार होता म्हणूनच आनंदीबाई ची जीवन वेली बहरत गेली.
एम् डी झाल्यावर आनंदीबाई जेव्हा भारतात परतल्या तेव्हा त्यांचे जोरदार स्वागत झाले . सर्वत्र अभिनन्दन झाले. त्यांना कोल्हापुर मधील एक स्थानिक हॉस्पिटलमधील स्त्रीकक्षाचा ताबा देण्यात आला.
आनंदीबाईना आपले पुढील ध्येय साध्य करायचेच होते. परंतु नीयतिला हे पहायचे नसावे . त्यांना क्षयरोग झाला. पुढे काही महिन्यातच म्हणजे फेब्रुवारी १८८७ मध्ये काळाने झड़प घातली आणि आनंदीबाईची जीवनज्योत मालवली.
केवळ २१ वर्षाच्या जीवन यात्रेत आनंदीबाईनि भारतीय स्त्रीयासाठी प्रेरणादायी जीवनादर्श उभा केला. एकीकडे सावित्रीबाई व ज्योतिबा स्रीशिक्षणासाठी खस्ता खात असतानाच आनंदी -गोपाल हे जोडपे आपले ध्येय प्राप्त करण्यासाठी झटत होते . जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही मोठे काम अशक्य नाह . समाजात राहून काम करायचे तर अड़थळे येणारच . मात्र त्यावर मात करून आपले ध्येय प्राप्त करून दाखविणे यातच जीवनाची खरी सार्थकता आहे.

डॉ.आनंदीबाई जोशी यांच्यावरील लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

## Joshi, (Dr.) Anandibai Gopalrao

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*