ठाकूर, हितेंद्र

thakur, hitendra

महाराष्ट्र विधानसभेतील विद्यमान आमदार महाराष्ट्रातील बहुजन विकास आघाडी ह्या राजकीय पक्षाचे अध्यक्ष असलेल्या हितेंद्र ठाकूर यांचा जन्म ३ ऑक्टोबर १९६१ साली झाला. १९८८ साली वसई तालुका युवक कॉंग्रेसच्या अध्यक्ष पदावर आरूढ होऊन आपल्या राजकीय कारकिर्दाची सुरुवात केली. प्रतिकूल परिस्थितीत १९९० मध्ये कॉंग्रेसने त्यांना विधानसभेचे तिकीट दिले व ते सर्वात तरुण आमदार म्हणून बहूमतांनी निवडून आले. पुढे आपल्या कार्यकर्तुत्वाने सतत चौथ्यांदा आणि मोठ्या मताधिक्याने निवडून आले. कालांतराने हितेंद्र ठाकूर यांनी “बहुजन विकास आघाडी”ची पक्षची स्थापना केली.सध्या तालुका पंचायत समिती, चारही नगर पालिका व बहुसंख्य ग्रामपंचायतीवर त्यांच्या वसई विकास मंडळाचे वर्चस्व आहे. ठाणे जिल्हा परिषद व ठाणे जिल्हा सहकरी बॅंकेच्या पदाधिकारी निवडीत त्यांच्ये मत निर्णायक असते विधान परिषदेचे उपसभापती वसंतराव डावखरे यांना विधान परिषदेवर तीनदा निवडून आणण्यात सिंहाचा वाटा आहे तसंच अभिनेते गोविंद आहुजा उर्फ गोविंदा यांना लोकसभेवर निवडून आणण्यात देखील त्यांचा खारीचा वाटा होता.

वि.वा ठाकूर चॅरिटेबल ट्रस्ट, या संस्थेमार्फत उत्कर्ष विद्यालय (मराठी व इंग्रजी माध्यम), कला, वाणिज्य व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय, वि. वा. ठाकूर पदवी महाविद्यालय सुरू केले. वि.वा.चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून आरोग्य तपासणी, नेत्राचिकिटसा, रक्तदान ,ज्येष्ठ नागरिकानसाठी ओळखपत्रे, अपंगांसाठी उपकरणांचे वाटप कार्यक्रमांचे आयोजन; झोपडपट्टी धारकाना स्वंयंपाक गॅसची वाटप.त्याचप्रमाणे वसई-विरार भागात अनेक सामाजिक व सांस्कृतिक महोत्सवांचे आयोजन हितेंद्र ठाकूर यांच्याकडून होत असते यांचे विधायक व सामाजिक काम व सर्वसमावेशक बेरजेच्या राजकारणामुळे वसई तालुक्यांतील विविध पक्ष्यांचे अनेक नेते त्यांचे नेतृत्व मान्य करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*