भिकले, उत्तम

Uttam Bhikele

काश्मीरमधील आकनूर सेक्टरमधील सुंदरबन परिसरात १८ मे २०१४ या दिवशी अतिरेक्यांनी हल्ला चढविला होता. उत्तम भिकले हा आपल्या अन्य सहकार्‍यांसोबत या सीमेवर गस्त घालत असताना, या भागात पेरून ठेवलेल्या सुरुंगाचा स्फोट झाला. यावेळी अतिरेक्यांशी झालेल्या चकमकीत भिकले शहीद झाले.

उत्तम बाळू भिकले हे २००२ साली मराठा लाईट इनफंन्ट्री कोल्हापूरमधून सैन्य दलात भरती झाले होते. गडहिंग्लज तालुक्यातील हडलगे हे उत्तम भिकले यांचं मूळ जन्मगाव .बेळगाव येथे प्रशिक्षण घेतल्यानंतर भिकले जम्मू येथे रूजू झाले. उत्तम भिकलेंचे प्राथमिक शिक्षण हडलगे येथे गावातील शाळेत, तर माध्यमिक शिक्षण एस. एस. हायस्कूल नेसरी येथे झाले. त्यानंतर छत्रपती शिवाजी ज्युनिअर कॉलेजमध्ये उत्तम भिकलेंने महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. २००८ मध्ये त्याचा विवाह झाला होता.

दिनांक १९ मे २०१४ रोजी रात्री ८ वाजता खास विमानाने दिल्ली येथून पुणे येथे उत्तम भिकले यांचे पार्थिव आणण्यात आले. त्यानंतर २० मे २०१४ रोजी पहाटे कोल्हापूरच्या १०९ टी ए बटालियनच्या कार्यालयात भिकले यांचे पार्थिव आणून ए बटालियनच्या वतीने भिकलेंना पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली.तसेच लष्कर व जिल्हा पोलीस प्रशासनाच्या वतीने हवेत बंदुकीच्या तीन फैरी झाडून शहीद जवान उत्तम भिकले यांच्या पार्थिवास शासकीय इतमामात सलामी देण्यात आली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*