जोशी, रंजन रघुवीर

घरातूनच वडिलांकडून चित्रकलेचा वारसा घेऊन आलेले रंजन जोशी ह्यांनी १९७२ साली कमर्शिअल आर्टची पदविका नैपुण्यासह मिळवली. पुढे १९७३ साली ते दक्षिणा फेलोशिपचे मानकरी ठरले. त्यांनी सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयात उपअधिव्याख्याता म्हणून काम केले आहे. गेल्या काही वर्षांपासून त्यांनी जागतिक दृककला शिक्षण क्षेत्रात सक्रिय योगदान दिले आहे.

इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका व पुणे येथील सिम्बॉयसिस संस्थेसाठी त्यांनी दृककला विषयात भरीव कामगिरी केली आहे. जागतिक रंगकला व तंत्रज्ञान या क्षेत्रातील तज्ञ म्हणूनही त्यांनी काम केले आहे.

१९७४ साली त्यांनी सर जे.जे. उपयोजित कला महाविद्यालयात व्हिज्यूअल कम्युनिकेशन क्लब ची स्थापना केली. १९९८ साली त्यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्टसाठी १० महिन्यांचा संगणकाधिष्ठित दृककला शिक्षणावर आधारित अभ्यासक्रम तयार केला होता. त्यांनी बॅंक ऑफ बडोद्याच्या BOBMAITRI याचे ग्राफीक्स डिझायनर म्हणून काम केले आहे. अनेक पुस्तकाच्या मुखपृष्ठाचं त्यांनी काम केलेलं आहे. अनेक संस्थांसाठी परीक्षक म्हणूनही त्यांनी काम केलं आहे. अनेक ठिकाणी व्याख्यानं, मुलाखती, तसेच लेख लिहून ते उपयोजित चित्रकला व दृककला शिक्षण क्षेत्रातील संशोधनाचे महत्व सर्वांना पटवून देतात.

रंजन जोशी यांनी ठाणे स्कूल ऑफ आर्ट या संस्थेच्या जडणघडणीत महत्वपूर्ण योगदान दिले आहे. १९८७ पासून येथे त्यांनी चित्रकला व मुलभूत दृककला ह्या विषयासंबंधी मार्गदर्शन केले आहे.

चित्रकलेतील कामगिरीबद्दल त्यांना अनेक पुरस्कार मिळाले आहेत. या १५ व्या महाराष्ट्र राज्य चित्रकला प्रदर्शनात अॅटोम फॉर पीस या भित्तीचित्राकरीता राज्य पुरस्कार व कांस्य पदक, तसेच कम्युनिकेशन आर्टस् गिल्डचा गुरु ऑफ द ईयर (२००५) इत्यादी पुरस्कारांचा समावेश होतो.

<!– – चित्रकार

गाव : आलेवाडी (सातपाटी – तारापूर)

पत्ता : विकास पाल्म, १०२ ए विंग, पहिला मजला, डॉ. आंबेडकर रोड, ठाणे

कार्यक्षेत्र : उपयोजित चित्रकला, द्दककला

दूरध्वनी : २५४१२९६८ – भ्रमणध्वनी : ९९२०१२५११२

ई-मेल : jorajan@yahoo.co.in
–>

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*