पंडिता रमाबाई

स्त्रियांच्या विशेषतः पतिता व विधवांच्या सर्वांगीण उध्दाराकरिता समर्पित भावनेने कार्यरत राहिलेली महाराष्ट्रीय विदुषी. लक्ष्मीबाई ऊर्फ अंबाबाई आणि अनंतशास्त्री डोंगरे हे त्यांचे माता पिता तेव्हाच्या म्हैसूर संस्थानातील मंगलोर जवळ माहेरंजी येथे राहणार्‍या हया चित्तपावन ब्राम्हण दांपत्याच्या […]

रत्नाकर मतकरी

३२ नाटकं, २३ कथासंग्रह, ६ निबंध संग्रह, १६ एकांकिका, १२ बालकुमार नाटकं आणि ३ कादंबर्‍या असे नव्वदपेक्षा अधिक विविध कलाकृतीचे विपुल लेखन करणारे रत्नाकर मतकरी. साहित्याचे विविध प्रकार त्यांनी आपल्या लेखनातून हाताळले असले तरी संपूर्ण महाराष्ट्राला त्यांची ओळख एक प्रतिभावंत नाटककार म्हणून जवळची वाटते. […]

रमेश तेंडुलकर

कवी, लेखक आणि समीक्षक असलेल्या रमेश अच्युत तेंडुलकर यांचा जन्म १८ डिसेंबर १९३० साली झाला. एम. ए. झाल्यानंतर त्यांनी काही वर्षे सी. आय. डी. विभागात काम केले. परंतु मुळात समीक्षकाची वृत्ती असल्यामुळे ते मुंबईच्या सिद्धार्थ महाविद्यालयात रजू झाले. […]

गझलकार सुरेश भट

कवी, पत्रकार, संपादक आणि मराठी गझल साहित्याचे मानदंड समजले जाणारे गझलकार सुरेश श्रीधर भट. १५ एप्रिल १९३२ रोजी अमरावती येथे सुरेश भटांचा जन्म झाला. शिक्षण अमरावती येथे झाले. बी. ए. ची पदवी त्यांनी विदर्भ महाविद्यालय येथून प्राप्त केली. त्यानंतर अनेक वृत्तपत्रातून ते लिखाण करू लागले. तरुणभारत, लोकसत्ता इ. वृत्तपत्रातून वार्ताहर म्हणून त्यांनी काम पाहिलं. ‘बहुमत’ या साप्ताहिकाचे ते काही वर्ष संपादकही होते. […]

राम गणेश गडकरी

मराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. आपल्या अल्पशा कारकीर्दीत त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व मराठी रसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. विशेषत त्यांच्या एकच प्याला` या नाटकाचे प्रयोग त्यांच्या मृत्यूनंतरही होत आहेत. […]

देव, (डॉ.) अनुप

डॉ. अनुप देव हे ठाणे येथील दंतचिकित्सक (Dentist) असून त्यांचा गेली तीस वर्षे कोपरी येथे दवाखाना आहे. त्यांचा आभामंडळ (Aura) या विषयावर गेली ७-८ वर्षे अभ्यास झाल्यामुळे दोन वर्षापूर्वी त्यांनी बायोपिल्ड इव्हॅल्युएशन या नावाचे सेंटर […]

सबनीस, उदय सखाराम

मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाने एक वेगळा ठसा उमटविणारे उदय सबनीस हे तर ठाण्यातील एक प्रसिद्ध व लाडकं व्यक्तिमत्व आहे. “रंजन युवा मंच” ह्या संस्थेतून त्यांनी स्वत:च्या कारकिर्दीची सुरुवात केली. ठाण्यातील कलासरगम या नाट्यसंस्थेतून त्यांनी एकांकिका केल्या. 
[…]

वाड, निशिगंधा

निशिगंधा वाड ही मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील एक अभिनेत्री आहे. लहानपणी दुर्गा झाली गौरी या मराठी नाटकातील तिचे काम लोकांच्या विशेष लक्षात राहिले. निशिगंधाने १०० हून जास्त मराठी व हिंदी चित्रपटांतून काम केले आहे. […]

प्रा. नागनाथ कोत्तापल्ले

कथालेखक, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून प्रसिद्ध असलेले नागनाथ लालुजीराव कोत्तापल्ले. नागनाथ कोत्तापल्ले यांचा जन्म २९ मार्च १९४८ रोजी नांदेड जिल्ह्यातील मुखेड या गावी झाला. १९६९ साली देगलूर येथील महाविद्यालयातून त्यांनी बी. ए. ची पदवी मिळविली. त्यानंतर मराठवाडा विद्यापीठातून एम. ए. आणि १९८१ साली पीएच. डी. ची पदवी ही त्यांनी मिळविली. […]

श्रीकांत वामन नेर्लेकर

ठाणे येथील ज्येष्ठ पत्रकार आणि लेखक. ठाणे रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनचे सदस्य, ६१ व्या मराठी साहित्य संमेलनात सहभाग. व्यास क्रिएशन्स संस्थेचे मार्गदर्शक.
[…]

1 2