अनिल मोहिले

अनिल मोहिलेंवर लक्ष्मीकांत-प्यारेलाल या जोडीतल्या प्यारेलाल शर्मा, शंकर-जयकिशन यांचे म्युझिक अरेंजर सॅबेस्टियन, कल्याणजी आनंदजी यांचे अरेंजर बाळ पार्टे आणि मदनमोहन यांचे अरेंजर सोनिक मास्तर यांचा प्रभाव होता.संगीतकार म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे तसेच अरुण पौडवाल यांच्या साथीने अनेक चित्रपटांना संगीत दिले. मराठी चित्रपट सृष्टीत अनिल अरुण या जोडीने अष्टविनायक या चित्रपटाला दिलेल्या संगीतामुळे त्यांना भरपूर प्रसिद्धी मिळाली.
[…]

देशमुख, गोपाळ हरी

सरदार गोपाळ हरी देशमुख (जन्म : फेब्रुवारी १८, इ.स. १८२३, मृत्यू : पुणे ऑक्टोबर ९ इ.स. १८९२. त्यांचे घराणे मूळचे कोकणातले वतनदार होते. घराण्याचे मूळचे आडनाव सिद्धये. त्यांच्या देशमुखी वतनामुळे देशमुख हे आडनाव रूढ झाले.
[…]

सुधीर भट

नाट्यनिर्माता संघाचा अध्यक्ष, नाटकांच्या तारखा आणि तिकीविक्री या विषयावर स्वतःची मते ठामपणे मांडणारा निर्माता म्हणून सुधीर भट यांची विशेष ओळख होती व राहील. त्यांनी गोपाळ अलगेरी यांच्या साथीने सुयोग या नाट्यसंस्थेची १ जानेवारी १९८५ मध्ये स्थापना केली. या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत ८० पेक्षा जास्त नाटके, १६ हजाराहून अधिक प्रयोग आणि एकहजार प्रयोगांचा टप्पा ओलांडणार्‍या आठ नाटकांची निर्मिती त्यांनी केली.
[…]

पवार, ललिता

ललिता पवार यांच्या व्यक्तिमंत्त्वात एकप्रकारचा नैसर्गिक खानदानी रुबाब असल्यामुळे त्यांच्या आवाजात हुकमी लय आहे आणि चेहर्‍यावरील विशिष्ट प्रकाराचा भाव असल्यामुळे खानदानी, तडफदार, सोजवळ तसेच प्रेमळ आणि खाष्ट अशा विरोधी भूमिकांही त्या यशस्वीपणे साकार करू शकल्या व त्यामध्ये नैसर्गिकता देकील पहायला मिळली.
[…]

पिळणकर, गजानन

रायगड जिल्ह्यातील चौल येथील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या गजानन पिळणकर यांना लहानपाणापासून शिक्षणाची आवड असल्यामुळे ते मुंबईत दाखल झाले व स्वकष्टाने स्वत:चं पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आणि मुंबई महापालिकेत नोकरी मिळवली.
[…]

वालावलकर, पं. पुरुषोत्तम

पंडित पुरुषोत्तम वालावलकर यांचा जन्म ११ जून रोजी झाला. बालगंधर्वांच्या नाटक मंडळींमध्ये बालपण व्यतीत केलेल्या वालावलकरांनी बालगंधर्वांपासून ते पंडित भीमसेन जोशी, पं.जितेंद्र अभिषेकी, पं. सी. आर. व्यास, शोभा गुर्टू अशा दिग्गज कलाकारांना संवादिनीची साथ केली होती.
[…]

पटवर्धन, (डॉ.) माधव त्र्यंबक (माधव जूलियन)

माधव जूलियन हे मराठी कवी, रविकिरण मंडळाचे संस्थापक व सर्वांत यशस्वी सदस्य देखील होते. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय व बहुमान माधवराव पटवर्धनांना जातो. […]

पेंटर, बाबुराव

बाबूरावांना चित्रपटांपेक्षा चित्रकलेत अधिक स्वारस्य होते, तसेच त्यांच्या चित्रपटनिर्मितीत व्यावसायिक बाबींचा अभाव होता. परिणामत: त्यांचे सहकाऱ्यांशी मतभेद झाले व त्यांपैकी काहीजण कंपनीतून बाहेर पडले. पुढे बाबूरावांनी “लंका” या चित्रपटानंतर आणखी तीन चित्रपटांची निर्मिती केली. त्यानंतर मात्र महाराष्ट्र फिल्म कंपनी कायमचीच बंद झाली.
[…]

परांजपे, राजा

शाळेत असतानाच नाटकात उत्तम भूमिका करून प्रसिद्ध झालेल्या राजाभाऊंचा अभिनेता म्हणून रसिकांच्या मनावर ठसा उमटला होता, तरी दिग्दर्शन हाच त्यांच्यासाठी सर्वांत यशाचा भाग ठरला. पण चित्रपटसृष्टीत त्यांचा प्रवेश अगदी सहजपणे झाला नव्हता. मूकपटांच्या जमान्यात पडद्यावर चित्रपट सुरू असताना साथीला बाहेरून संगीत वाजवले जाई, त्या वेळी अशा मंडळींना गंमत म्हणून साथ करणारे राजाभाऊ हळूहळू चित्रपटसृष्टीकडे वळले. […]

राम गबाले

राम गबाले यांनी मुंबई व दिल्ली दूरदर्शनसाठी शंभराहून अधिक अनुबोधपट, व्हिडिओ फिल्म्स, मालिका आणि टेलिफिल्मशी निर्मितीही त्यांनी केली होती. निर्माता आणि लेखक या नात्याने ते या माध्यमाशी निगडित होते. रिचर्ड अ‍ॅटनबरो यांना ‘गांधी’ या चित्रपटासाठी नियोजन करण्यासाठी त्यांनी विशेष सहकार्य केले होते. “
[…]

1 2