सांगुर्डेकर, (डॉ.) प्रकाश राजाराम

Dr. Prakash Sangurdekar

 

भाभा अणू विज्ञान संस्थेत वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत असणारे व निवृत्ती नंतरही स्वत:ला वैज्ञानिक क्षेत्रात झोकून देऊन ठाणे शहराचे नाव वैज्ञानिक क्षेत्रात उज्वल करणारे डॉ. प्रकाश राजाराम सांगुर्डेकर.

डॉ. सांगुर्डेकर १९६८ सालापासून भाभा अणुसंशोधन केंद्रातील विकिरण संरक्षण प्रणाली प्रभागात वैज्ञानिक अधिकारी म्हणून कार्यरत होते. किरणोत्सारी समस्थानिके व स्त्रोत निर्माण करणार्‍या प्रयोगशाळेत या स्त्रोतांची हाताळणी करणार्‍या कर्मचार्‍यांच्या स्वास्थाच्या सुरेक्षेबाबत काटेकोरपणे परीक्षण करणे व योग्य मार्गदर्शन करणे ही त्यांची मुख्य जबाबदारी होती. “युरोनियम, थुलियम, व कोबाल्ट यांची द्रावक निष्कर्षण” या विषयावर संशोधन करुन त्यांनी मुंबई विद्यापीठाची पी.एच.डी. पदवी १९८६ साली प्राप्त केली. त्यांचे सुमारे ५० शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. तसेच विज्ञान परिषद वाशी, मराठी विज्ञान परिषद, ईशान्य मुंबई व जिज्ञासा ठाणे या संस्थांचे क्रियाशील सभासद आहेत. गेली पाच वर्षे राष्ट्रीय बालविज्ञान परिषद, नवीमुंबई चे सहसमन्वयक या नात्याने राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये ठाण्यातील शालेय मुलांनी सहभाग घ्यावा यासाठी विद्यार्थी व शिक्षकांसाठी ते कार्यशाळेचे आयोजन करीत आहेत. तसेच मुलांमध्ये विज्ञान विषयाची गोडी निर्माण होण्यासाठी “फन विथ सायन्स” या विज्ञान प्रयोगावर आधारित कार्यक्रमाचे आयोजन ते करीत आहेत. तसेच ओरिगामी कार्यशाळा व प्रदर्शनाचे देखिल आयोजन त्यांनी केले आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*