सहस्त्रबुद्धे, पूजा विजय

Sahastrabuddhe, Pooja Vijay

Pooja Sahasrabuddhe

टेबलटेनिस या क्रीडा प्रकारात नैपुण्य मिळवून ठाण्याचं नाव या क्षेत्रात झळकवणारी आणखी एक टेबलटेनिसपटू म्हणजे पूजा विजय सहस्रबुद्धे!

वयाच्या ९ व्या वर्षांपासूनच तिनं बुस्टर क्लब इथे सौ. शैलजा गोहाड यांच्या मार्गदर्शनाखाली टेबलटेनिसचे प्रशिक्षण घ्यायला सुरुवात केली. २००१ पासून २०११ पर्यंत राज्यस्तरावर ठाण्याचे प्रतिनिधीत्व करुन वैयक्तिक ६ सुवर्णपदकांसह; सांधिक १० सुवर्ण, १ रौप्यपदक तिने पटकावलं आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्येही सुवर्ण, रौप्य, कांस्य पदके मिळवली. तिच्या या यशाबद्दल पूजाला २०११ चा “ठाणे गुणीजन पुरस्कार”, झारखंड येथील राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत २ सुवर्णपदकं पटकवल्याबद्दल २०११ चा मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या हस्ते शासनाचा पुरस्कार, २००८ च्या युथ कॉमनवेल्थ गेम्समधील रौप्यपदकासाठी शासनाचा पुरस्कार असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

प्रथम २००४ साली भारताचे प्रतिनिधीत्व करुन तिनं आपल्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील कारकीर्दीस सुरुवात केली. २००६ साली ज्युनिअर युथ नॅशनल चॅम्पियन म्हणून किताब तिने पटकावला. २००८ सालीच युथ कॉमन वेल्थ डबल्स मध्ये रौप्य पदक, २००९ साली साऊथ एशियन ज्यु. चॅम्पियनशिप २०११ च्या नॅशनल गेम्समध्ये २ सुवर्णपदकांची कमाई तिने केली.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*