मुजुमदार, अमोल अनिल

Amol Mujumdar

मुंबईमध्ये ११ नोव्हेंबर १९७४ रोजी जन्मलेल्या अमोल मुजुमदार हा मुंबई, आसाम व आंध्र प्रदेश या संघांकडून प्रथमश्रेणी क्रिकेट खेळलेला खेळाडू आहे. रणजी करंडक स्पर्धेत कारकिर्दीत सर्वाधिक धावा जमविणार्‍या खेळाडूंपैकी तो एक आहे.  प्रथम श्रेणीच्या सामन्यातील अनेक विक्रम अमोलच्या खात्यावर जमा आहेत.

सचिन तेंडूलकर, विनोद कांबळी आणि अमोल मुजुमदार हे शालेय क्रिकेटपासून एक घट्ट त्रिकूट होते. मात्र विविध कारणांमुळे अमोलला भारतीय संघातून खेळण्याची संधी मिळाली नाही. यातील सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे भारतीय क्रिकेटमध्ये प्रचलित असलेली कोटा पद्धत. एकाचवेळी मुंबईचे अनेक खेळाडू भारतीय संघात असल्यामुळे त्याला अनेकदा चांगली कामगिरी करुनही भारतीय संघात स्थान मिळू शकले नाही.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*