सदाशिव पां. टेटविलकर

टेटविलकर, सदाशिव पां.

असं म्हणतात माणूस जेव्हा जन्माला येतो तेव्हाच त्याने आयुष्यात काय करायचे आहे हे निश्चित झालेले असतं ! त्यामुळेच की काय पुढे जाऊन त्याच्या आयुष्याला एक वळण मिळतं आणि तिथुन त्याचा, त्याच्या नशिबात लिहिलेल्या मार्गाने प्रवास सुरु होतो. असंच काहीसं इतिहास लेखक सदाशिव टेटविलकरांच्या बाबतीत झालं असावं. इतिहास विषयीची उच्च पदवी वा तत्सम कोणतीही शैक्षणिक पार्श्वभूमी नसताना केवळ आंतरिक ओढीनं जवळजवळ ४० वर्षं दुर्गभ्रमंतीच्या भटकंतीतून गाठलेले अनुभव जेव्हा त्यांच्या लेखनातून खुले झाले तेव्हा वाचकवर्गासाठी एक नवे दालन उपलब्ध झाले.

१९७० पासून समविचारी मित्रमंडळीबरोबर सुरु केलेली गड-किल्ल्यांची वारी आजपर्यंत अविरत चालू आहे. याच वारीत त्यांना गोनिदांच्या मार्गदर्शनाचा परीसस्पर्श लाभला. १९७८ पासून सदाशिवरावांनी इतिहास विषयक लेखनास सुरुवात केली. दै. लोकसत्तानी उपलब्ध करुन दिलेले साहित्यावकाश आपल्या लेखन शैलीमुळे त्यांनी समर्थपणे पेलून धरले. त्यानंतर आजपर्यंत वृत्तपत्र, साप्ताहिक, मासिकांमधून दोनशेच्यावर लेख प्रसिद्ध झालेले आहेत.

मनातील ठाणे :

समज येवू लागल्यापासून १९६० पर्यंतचे ठाणे टुमदार, हवेशीर आणि हवेहवेसे वाटत होते. ठाण्याचं ते गावपण जाऊन आज २१ व्या शतकात वाटचाल करणारं अत्याधुनिक महानगर झालं आहे, हा बदल स्वाभाविकच आहे. ज्याप्रमाणे काळाच्या प्रत्येक टप्प्यावर संस्कृती आपली कात टाकून नवी तकाकी घेत असते, त्याचप्रमाणे श्रीस्थानक ते ठाणे हा हजार – बाराशे वर्षांचा ठाण्याचा प्रवास असाच आहे. यात सर्वात महत्वाचा भाग म्हणजे हा प्रवास सर्वधर्म समभावाचा आहे. ही एकस्वरुपात भविष्याचा वेध घेत ठाण्याचा विकास करील.

पुरस्कार : “ठाणे गुणीजन” पुरस्कार, वेक-अप ह्युमन संस्थेचा राज्यस्तरीय “साहित्य रत्न”, पुरस्कार, महाराष्ट्र लोककलावंत प्रतिष्ठानचा “लोरगौरव” पुरस्कार इत्यादी पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*