विस्तृत स्व-परिचय

नावनिनाद अरविंद प्रधान

व्यवसाय : भारतीय भाषांमधील सॉफ्टवेअर आणि तंत्रज्ञानाचा विकास आणि सेवा पुरवठा. डिजिटल पब्लिशिंग, इंटरनेट पोर्टल्स, ऑनलाईन उपक्रम या विषयांमध्ये सल्लागार.

शिक्षण : १९७९ च्या बॅचचा इलेक्ट्रिकल इंजिनिअर.

ग्राहक वर्ग : वर्तमानपत्रे, प्रकाशक, प्रकाशनसंस्था, मिडिया, कॉर्पोरेट जगत, राजकीय पक्ष, सरकारी उपक्रम आणि खाती त्याचबरोबर संगणक वापरणारा सामान्य माणूसही….

व्यावसायिक माहिती:

• indianlanguages.com या भारतीय भाषेतील फॉन्टस वापरुन तयार केलेल्या जगातल्या पहिल्या वहिल्या वेबसाईटची सह-निर्मिती. (१९९५ साली)

• मराठीसृष्टी या मराठीतील मेगा पोर्टलची निर्मिती. मराठी भाषेच्या विकासासाठी या पोर्टलचे खास प्रयत्न. १९९२ पासून Geocities वर आणि १९९५ पासून स्वतःच्या marathisrushti.com या डोमेनवर पोर्टल कार्यरत. ४,५०,००० हून जास्त नोंदणीकृत सभासद (बहुतांशी मराठीच).

• “मराठी व्यक्ती संदर्भ कोश” या नावाने, विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि होउन गेलेल्याही मराठी व्यक्तींचा ऑनलाईन कोश (Encyclopedia) बनविण्याचे काम सध्या सुरु. मार्च २०२२ पर्यंत १००,००० व्यक्तींची माहिती संग्रहित करण्याचे उद्दिष्ट.

• “अपनामेल” या भारतातल्या पहिल्या बहुभाषिक इ-मेल सिस्टिमची सहनिर्मिती (१९९९ साली)

• भारतीय भाषांमध्ये सॉफ्टवेअर बनविणार्‍या संस्था आणि कंपन्यांशी कोअर टेक्नॉलॉजी सेवांसाठी संलग्न

• मिडिया हाउसेस, तत्सम कंपन्या आणि वर्तमानपत्रे यांच्याशी तंत्रज्ञान विषयक बाबीसाठी संलग्न

• मिडिया, वर्तमानपत्रे, राजकीय पक्ष, वृत्तसेवा, जनसंपर्क संस्था यांना तंत्रज्ञान विषयक सल्ला-सेवा

विशेष कार्य

• १९९३ मध्ये – ज्यावेळी इंटरनेटवर केवळ रोमन लिपीचेच प्राबल्य होते तेव्हा – भारतीय भाषा – विशेषत: मराठी आणि हिंदी – इंटरनेटविषयक तंत्रज्ञानाची निर्मिती. यामुळे भारतीय भाषांचा इंटरनेटवरील प्रवेश सुलभ झाला.

• १९९४ मध्ये वापरायला अत्यंत सोप्या अशा “इंग्लिश फोनेटिक” या मराठी व हिंदी कि-बोर्डची निर्मिती.

• १९९४ मध्ये अत्यंत किफायतशीर अशा “फ्रीडम” या मराठी सॉफ्टवेअरची निर्मिती.

• २००१ साली “लोकसत्ता फॉन्टफ्रीडम” या इंडियन एक्सप्रेस ग्रुप व लोकसत्ताच्या सहयोगाने उपलब्ध झालेल्या मराठी व हिंदी सॉफ्टवेअरची निर्मिती. या सॉफ्टवेअरच्या ‘फॉन्टफ्रिडम गमभन’ सहित ६ आवृत्ती निघाल्या असून जगभरातील ४५०,००० संगणकांवर ते वापरात आहे. केवळ २९९ रुपयात उपलब्ध झालेले हे पहिलेच मराठी सॉफ्टवेअर होते. 

• २०२१ मध्ये “फॉन्टफ्रीडम स्मार्ट २०२१” या सॉफ्टवेअरची निर्मिती. यामध्ये कोणत्याही भारतीय भाषेत काम करण्याची सोय आहे. यात मराठी OCR करण्याचीही सोय आहे. 

• मराठी भाषेतील दहा लाख पाने इंटरनेटवर उपलब्ध करुन देण्यासाठी Mision 1M या महत्त्वाकांक्षी  प्रकल्पावर काम सुरु आहे.  त्याचप्रमाणे मराठी साहित्यिकांना ग्लोबल करुन त्यांचा Brand बनवण्यासाठी यंत्रणा उभी केली आहे. 

• मराठी इ-पुस्तकांच्या प्रकाशन आणि प्रसारासाठी एक नवा प्लॅटफॉर्म सुरु केला आहे. 

• “मायबोली” या मराठी मेगा सीडीची निर्मिती…

• १९९८ मध्ये देवनागरी लिपीतील कोणत्याही फॉन्टमधील मजकूर देवनागरीतल्या दुसर्‍या कोणत्याही फॉन्टमध्ये नेण्यासाठी उपयुक्त अशा “फॉन्टसुविधा” या सॉफ्टवेअरची निर्मिती. ५५ हून अधिक फॉन्ट फॅमिलीज आणि ३००० हून अधिक फॉंट्सना सपोर्ट करणारे अशा प्रकारचे जगातले हे एकमेव सॉफ्टवेअर आहे.

• वर्तमानपत्रांना बातम्या आणि इतर मजकूर त्यांच्याच फॉन्टमध्ये पाठविण्यासाठी उपयोगी असणारे “एक्सप्रेस पीआर” या सॉफ्टवेअरची निर्मिती

• वर्तमानपत्रे आणि वेब पोर्टल्ससाठी भारतीय भाषांमधील पहिल्या कंटेंट मॅनेजमेंट सिस्टिमची निर्मिती. हे सॉफ्टवेअर कोणत्याही भाषेतील कोणत्याही फॉन्टमध्ये वापरता येते. मराठीतील लोकमत, लोकसत्ता, देशोन्नती यासारख्या आघाडीच्या मराठी वृत्तपत्रांबरोबरच भारतातील इतरही भाषांतील वृत्तपत्रे आणि इंग्रजी, फ्रेंच आणि नेपाळी भाषेतील वृत्तपत्रांसाठीही हे सॉफ्टवेअर वापरले आहे. 

इतर उल्लेखनीय

• २५० हून अधिक तंत्रज्ञान परिषदा आणि सेमिनार्समध्ये भारतीय भाषांमधील संगणकीकरणाविषयी प्रबंध आणि सादरीकरण

• नॅसकॉमच्या तंत्रज्ञानविषयक परिषदांमध्ये सहभाग

• वर्ल्ड न्यूजपेपर कॉन्फरन्समध्ये सहभाग आणि सादरीकरण

• रोटरी क्लबमध्ये सक्रीय सहभाग

संपर्क :

पत्ता : चाणक्य, २ रा मजला, क्लासिक प्लाझाच्या मागे, गोखले रोड, नौपाडा, ठाणे ४००६०२

कार्यालय दूरध्वनी : 91-9820310830 

वेबसाईट : www.ninadpradhan.com ; www.cybershoppee.com ; www.marathisrushti.com