चीनमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वे पूल

World's Longest Railway Bridge in China

चीनमधील दॅनयांग कुंशन ग्रॅण्ड ब्रिज हा जगातील हाय स्पीड रेल्वेसाठी बांधलेला सर्वात लांब पुल आहे. या पुलाची लांबी १६४.८ किलोमीटर तर रुंदी ८० मीटर आहे. या पुलावरुन जाणारा रेल्वेमार्ग शांघाय आणि नानजिंग या शहरांना जोडतो.

हा पुल २०११ मध्ये वाहतूकीसाठी खुला करण्यात आला. ८.५ दशलक्ष डॉलर्स खर्च करुन बांधलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी १०,००० कर्मचारी ४ वर्षे काम करत होते.

मोठे आणि लांब पुल बांधण्यात चीन आघाडीवर आहे. जगातील ३५ लांब पुलांपैकी १७ चीनमध्ये आहेत.

जगातील पहिल्या तीन क्रमांकांचे लांब पूल चीनमध्येच आहेत. दुसर्‍या क्रमांकावर टियानजिंग ग्रॅंड ब्रिज (११३.७ कि.मी.) तर तिसर्‍या क्रमांकावर Weinan Weihe Grand (७९.७३ कि.मी.) आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*