इगतपुरी – एक नयनरम्य हिल स्टेशन

Igatpuri - A Picturesque Place in Maharashtra

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे शहर महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाते. येथे मोठ्या प्रमाणावर पाऊस पडतो.  अनेक छोटे-मोठे धबधबे या ठिकाणी पहायला मिळतात.

इगतपुरी शहर मुंबई-नाशिक-आग्रा महामार्गावर मुंबईपासून सुमारे १३० किमी वर आहे. समुद्र सपाटीपासून या शहराची उंची सुमारे १९०० फूट आहे.

ज्याप्रमाणे खंडाळा घाट ओलांडल्यावर खंडाळा लागते त्याचप्रमाणे  कसारा घाट ओलांडल्यावर इगतपुरी शहर लागते.  इगतपुरी आणि खंडाळा साधारणपणे एकाच उंचीवर आहेत.

इगतपुरी गावाबाहेर डोंगराच्या पायथ्याशी असलेले विपश्यना केंद्र शहराचे खास आकर्षण आहे. येथे  देशातील निरनिराळ्या भागातून, तसेच परदेशांतूनही अनेक लोक विपश्यनेसाठी येतात.

इगतपुरीहुन साधारण ४०-५० किमी अंतरावरील भंडारदरा हे धरण आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*