चंद्रपूर जिल्हा

कोळसा व चुन्याच्या खाणींसाठी चंद्रपूर जिल्हा प्रसिद्ध आहे. म्हणूनच चंद्रपूर जिल्ह्याला काळ्या सोन्याची भूमी असेही म्हणतात. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांचा आश्रय व ज्यांचे अनमोल कार्य ज्या जिल्ह्याला लाभले तो हा चंद्रपूर जिल्हा. याच जिल्ह्यात ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटे यांनी स्थापन केलेल्या ‘आनंदवन’चे अविरत सेवाकार्यही सुरु आहे. औष्णिक विद्यूत निर्मिती केंद्र, देशातील प्रमुख कागद कारखाना, खनिजदृष्ट्या समृद्धी, जिल्ह्याच्या एकूण भौगोलिक क्षेत्राच्या ३५ टक्क्यांहून अधिक असलेले वनक्षेत्र ही या जिल्ह्याची खास वैशिष्ट्ये. महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान असण्याचा मान ज्याला मिळतो असे ताडोबा राष्ट्रीय उद्यानही याच जिल्ह्यातले. संपूर्ण महाराष्ट्रात भाताच्या उत्पादनात चंद्रपूर जिल्ह्याचा चौथा क्रमांक आहे.