मराठवाड्यातील ऐतिहासिक शहर लातूर

लातूर हे मराठवाडयातील एक ऐतिहासिक शहर आहे. दक्षिणेवर राज्य करणार्‍या राष्ट्रकूट राजांच्या राजधानीचे हे शहर होते. पहिला राष्ट्रकूट राजा दंतिदुर्ग याच शहरात राहत असे या शहराचे तत्कालीन नाव कत्तलूर असे होते. पुढे अपभ्रंश होत त्याचे […]

लातूर जिल्हा

लातूर हा मराठवाडा विभागातील एक प्रमुख जिल्हा असून अलीकडच्या काळात लातूर एक गुणवत्तापूर्ण शैक्षणिक केंद्र बनले आहे. ३० सप्टेंबर १९९३ ला पहाटे ३.५६ वाजता झालेल्या ह्या भीषण भुकंपामुळे जिल्ह्याचे प्रचंड नुकसान झाले होते. परंतु पुढील […]

लातूर जिल्ह्यातील शेतीव्यवसाय

कृषिप्रधान असलेल्या लातूर जिल्ह्यात ज्वारी हे प्रमुख पीक असून ऊसाखालचे क्षेत्रदेखील लक्षणीय आहे. कन्हार जिल्ह्यातील नद्यांच्या खोर्‍यांमध्ये अतिशय सुपीक माती आढळते. काही भागात हलकी,मध्यम स्वरुपाची तर काही भागात भरडी जमीन आढळते.औसा येथील द्राक्षे प्रसिद्ध आहेत. […]

लातूर जिल्ह्यातील लोकजीवन

लातूरला मराठवाड्याचे पुणे म्हणून ओळखले जाते. लातूर जिल्हा हा शैक्षणिकदृष्ट्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाशी जोडला असून या विद्यापीठा-अंतर्गत सर्वांत जास्त ६६ महाविद्यालये आहेत. नांदेडच्या स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाचे एक उपकेंद्र लातूर येथे स्थापन होत […]

लातूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

महाराष्ट्राच्या दक्षिण-पूर्व सीमेवर आणि कर्नाटकाच्या उत्तर-पूर्व सीमेजवळ हा जिल्हा स्थित असून महाराष्ट्राच्या औरंगाबाद विभागातील एक महत्त्वाचा जिल्हा आहे.आग्नेय महाराष्ट्रात मराठवाडा विभागात असणार्‍या लातूर जिल्ह्याचे क्षेत्रफळ सुमारे ७,१५७ चौ. कि. मी. असून जिल्ह्याच्या उत्तरेस परभणी, उत्तर […]

लातूर जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

प्रसिद्ध स्थापत्य विशारद श्री.फैयाजुद्दीन यांच्या कल्पना आविष्कारातून साकारलेली लातूर शहरातील ‘गंजगोलाई’ ही वर्तुळाकार बाजारपेठ तिच्या रचनेमुळे आकर्षक ठरते. शहरातील अनेक रस्ते या बाजारपेठेस वेगवेगळ्या बाजूंनी येऊन मिळतात. येथील सुरतशाहवाली दर्गा, सिद्धेश्वर मंदिर, केशवराज मंदिर, लातूर-औसा […]

लातूर जिल्ह्यातील दळणवळण सोयी

लातूर जिल्ह्यात सुमारे ८७६३ कि.मी.लांबीचे रस्ते असून त्यापैकी राज्य मार्गाची लांबी ८४५ कि.मी.आहे. रस्त्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे ८०% गावे जिल्हा मुख्यालयाशी जोडली गेली आहेत. लातूर शहर मनमाड-सिकंदराबाद या रुंदमापी (ब्रॉडगेज) लोहमार्गाशी जोडण्यात आले असून लातूर-कुर्डूवाडी […]

लातूर जिल्ह्यातील उद्योगव्यवसाय

स्वातंत्र्यपूर्व काळात होती लोकमान्य टिळक यांनी १८९१ मध्ये लातूर येथे सूत गिरणी सुरू केली होती. पुढे लातूर जिल्ह्याच्या निर्मितीनंतर येथील औद्योगिक विकासाला चालना मिळाली. सद्य:स्थितीत लातूर, निलंगा व औसा या ठिकाणी औद्योगिक वसाहती असून हाळी-हंडरगूळी, […]

लातूरमधील व्यक्तीमत्वे

भारताचे माजी गृहमंत्री व कॉंग्रेस नेते, हे शिवराज पाटील हे लातूरचे आहेत. त्याचप्रमाणे माजी केंद्रीय विज्ञान व तंत्रज्ञान मंत्री व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांचा जन्मही लातुर जिल्ह्यातलाच.

लातूर जिल्ह्याचा इतिहास

प्रारंभीच्या काळात मौर्यांच्या अधिपत्याखाली असणारा लातूर हा भाग पुढे सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याच्या अंमलाखाली होता. पुढे काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले. मध्यंतरी औरंगजेबाने हा भाग […]