बीड जिल्ह्यातील पर्यटनस्थळे

१२ ज्योतिर्लिंगापैकी पाचवे ज्योतिर्लिंग परळी येथे आहे. ते जवळजवळ सातशे वर्ष जुने असून अहिल्याबाई होळकरांनी त्याचा इ.स. १७०६ मध्ये जिर्णोध्दार केला.
बीड जिल्ह्यात अनेक प्रसिध्द मंदिरे आहेत.अंबेजोगाई हे श्री योगेश्र्वरी मातेच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे,आणि येथे खोलेश्वराचे प्राचीन मंदिरदेखील आहे.कंकाळेश्वर, जटाशंकर मंदिर, खंडेश्र्वीर मंदिर आणि खरडोबा मंदिर ही काही प्रमुख होत.शहरात पीर बालाशहा व मंसूरशहा यांचे दर्गे आहेत.
संतकवी दासोपंत यांची समाधी अंबेजोगाई येथे आहे. दासोपंतांनी लिहिलेली (१२ मीटर लांब व १ मीटर रुंदीची) पासोडी, येथे पाहावयास मिळते.
ज्यांना मराठीतील आद्यकवी मानले जाते अशा कवी मुकुंदराज यांची अंबेजोगाईमध्ये समाधी आहे. याचबरोबर या तालुक्यातील धर्मपुरी येथील केदारेश्र्वराचे मंदिर देखील प्रसिद्ध व प्रेक्षणीय आहे.
लिंगायत पंथातील श्री मन्मथ स्वामींचे मंदिर आहे, तसेच येथून जवळच कपिलधार नावाचा धबधबा आहे. माजलगाव तालुक्यात गंगामसला येथील श्री मोरेश्वराचे किंवा भालचंद्र गणेशाचे स्वयंभू व जागृत स्थान प्रचलित आहे. माधवराव पेशवे यांनी हे मंदिर बांधल्याचे उल्लेख सापडतात. बीड तालुक्यातील नायगांव येथील मोरांसाठीचे अभयारण्य हे राज्यातील वैशिष्ट्यपूर्ण अभयारण्य होय.
धारूर येथे सातवाहनकालीन भुईकोट किल्ला असुन शिवकाळात नेताजी पालकर यांना या किल्ल्यातील कारावासात ठेवण्यात आले होते. येथील अहिल्याबाई होळकरांनी बांधलेले अंबादेवीचे मंदिर, हेमाद्रीपंतांनी बांधलेले धारेश्वर मंदिर प्रसिद्ध आहे.
पाटोदा तालुक्यात विंचरणा नदीवरील सौताडा येथील धबधबा प्रसिद्ध आहे. राक्षसभुवन हे गेवराई तालुक्यातील गोदावरी काठचे गाव होय. येथील शनी मंदिर प्रसिद्ध आहे. उपरोक्त स्थानांसह पाटोदा तालुक्यातील चिंचोली हे थंड हवेचे ठिकाण, येथीलच श्री गहिनीनाथांचे मंदिर व बीड तालुक्यातील नवगण राजुरी येथील नऊ गणेशमूर्तींचे स्थानं ही इतर स्थळेसुद्धा प्रेशणीय आणि प्रसिद्ध आहेत.

Damnification only used in legal contexts today, this word, meaning to cause injury write my paper for me to’, has a fun, strangely proper sound to it

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*