चंद्रपूर जिल्ह्याची भौगोलिक माहिती

चंद्रपूर जिल्हा हा महाराष्ट्र राज्यातील विदर्भ विभागात आहे. या जिल्ह्याचे क्षेत्रफळ १०,४९० चौ.कि.मी. आहे तर लोकसंख्या २०,७१,१०१ इतकी आहे. जिल्ह्याच्या उत्तरेस नागपूर जिल्हा, भंडारा जिल्हा व वर्धा जिल्हा, पश्चिमेस यवतमाळ जिल्हा, पूर्वेस गडचिरोली जिल्हा, दक्षिणेस आदिलाबाद जिल्हा (आंध्र प्रदेश) आहे.हा जिल्हा वैनगंगा व वर्धा नदीच्या पात्रांदरम्यान वसला आहे. जिल्ह्याचे तापमान किमान ७.१ ते कमाल ४७.२ से. च्या दरम्यान असते. पर्जन्यमान १३९८ मि. मी. इतके आहे. उन्हाळा मोठा व कडक असतो तर हिवाळा कमी कालावधीचा पण सौम्य असतो.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*