उस्मानाबाद जिल्ह्याचा इतिहास

२० व्या शतकाच्या सुरुवातीला तत्कालीन निजाम उस्मान अली याने स्वत:च्या नावावरून या शहराला उस्मानाबाद असे नाव दिले.१९४७ मध्ये भारत ब्रिटिश राजवटीच्या जोखडातून मुक्त झाल्यानंतर संपूर्ण भारतासोबत स्वातंत्र्याचा जल्लोष साजरा करण्याचे भाग्य  निजामाच्या राजवटीमुळे या जिल्ह्याला मिळाले नाही ,परंतु १९४८ मध्ये हा जिल्हा स्वतंत्र भारताचा हिस्सा बनला. या जिल्ह्याचे प्रमुख स्थान असलेल्या उस्मानाबाद शहराचे नाव पूर्वी  ‘धाराशिव’ असे होते.
उस्मानाबाद जिल्ह्याची  भूमी  ही  श्रीराम वनवासात असताना त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली  भूमी मानली जाते. या भागावर मौर्य, सातवाहन, राष्ट्रकूट व यादव घराण्याची सत्ता असल्याचे दाखले इतिहासात आढळतात. काही काळ या प्रदेशावर दिल्लीचे सल्तनत, बहामनी राजवट, निजामशाह व आदिलशाह यांनी राज्य केले. मध्यंतरी औरंगजेबाने हा भाग मोगल सत्तेच्या अंमलाखाली आणला. स्वातंत्र्यप्राप्तीच्या काळापर्यंत निजामाच्या अमदानीत असणारा हा भाग १९४८ मध्ये तत्कालीन मुंबई प्रांतात समाविष्ट करण्यात आला. १९६० मध्ये  स्वतंत्र महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर उस्मानाबाद जिल्हा महाराष्ट्राचा अविभाज्य भाग बनला. १५ ऑगस्ट ,१९८२ मध्ये उस्मानाबादचे विभाजन करून लातूर जिल्हा  वेगळा करण्यात आला.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*