बिनतारी विश्वस्तता ऊर्फ WiFi

मंडळी सप्रेम नमस्कार !

एकविसाव्या शतकातल्या नवनवीन शोधांनी अापण खरंच चक्रावून जातो….. संगणक…मग मोबाईल …. मग फेसबुक …. मग WiFi…..

पण हि बिनतारी विश्वस्तता म्हणजेच WiFi हा काहि एकविसाव्या शतकातला शोध नाहिये तर तो युगानुयुगांपूर्वीपासूनचा शोध अाहे असं मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हि मला वेड्यात काढाल…..सांगतो , ऐका

अापला जन्म अाईच्या उदरांत ९ महिने ९ दिवस पोसलं गेल्यावर होतो , अापण जन्माला अाल्यावर ज्या नळीतून अाईच्या शरीरातील अन्न पोटांत असताना अापल्या निर्माण अवस्थेत पोचवलं जातं , ती नळी — म्हणजेच नाळ हल्ली डाॅक्टर व पूर्वी सुईणी कापून टाकत असंत.सिंधूताई सपकाळांना तर हे काम लेकीच्या जन्मानंतर स्वत:च करावं लागलं…..

तर मंडळी , ही नाळ कापून टाकल्यावर अापण स्वतंत्र किंवा बिनतारी होतो.पण अापली अाई मात्र….. तिच्या अंतापर्यंत माझ्या अपत्याला { मुलगा वा मुलगी या दोन्हि अर्थाने } भूक लागली असेल या जाणिवेने अापल्या जन्मापासून निरंतर अापल्या सेवेत अहोरात्र राबते.बापसुद्धा प्रेमळ असतो , पण अाईसाठी अापण काळजाचा तुकडा असतो!कसंहि अपत्य असेल तरी अाई अापल्या जिवाची पर्वा न करता अपत्याला जपते , सांभाळते , वाढवते अाणि अपत्य? ज्या बेंबी पासून ते बिनतारी झालेलं असतं , त्या बेंबीपासून किंचाळंत अायुष्यभर अाईला दुरुत्तर करतं….. अपत्य मुलगी असेल तर ती स्वत: गरोदर राहिल्यावर तिला अाईची खरी किंमत कळते ! मुलगा असेल तर बाप झाल्यावर जेंव्हा त्याची अपत्यं त्याला दुरुत्तर करतात तेंव्हा त्याला कळतात अापल्या अाईशी वागण्यातल्या चुका !

मंडळी वेळ निघून गेल्यावर समज येऊन उपयोग नसतो , तेंव्हा ईश्वराने दिलेली हि बिनतारी विश्वस्तता ऊर्फ Wireless Fidelity alias WiFi जपा , याचं Network जगातलं सर्वांत भक्कम network असतं , वेळ निघून जाण्यापूर्वी अापल्या WiFi च्या संपर्कात रहा , जमलं तर सेवा करा , नाहि जमलं तर कमीत कमी उपद्रव तरी देऊ नका ! अाई हे जगातलं उत्कृष्ट WiFi असतं अाणि बाप हा एकमेव सेवा पुरवणारा Router असतो !

उदय गंगाधर सप्रेम—ठाणेमहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

50-chandrabhaga

पंढरपूरची चंद्रभागा नदी

भीमा नदी पंढरपुरात चंद्रभागा नावाने ओळखली जाते. भाविक पंढरीत पाऊल ...
p-2281-kadav-ganpati-temple

दिगंबर सिद्धीविनायक, कडाव

कर्जत तालुक्यातील कडाव गावामधील हे बाल दिगंबर गणेशाचे अतिप्राचीन मंदिर ...
p-2062-Ralegan-Siddhi-04

पर्यावरण संवर्धक राळेगणसिध्दी

अहमदनगर जिल्ह्यातील राळेगण सिध्दी हे गाव मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्याच्या पारनेर ...
marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...

Loading…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*