बॉलिवूडचा राजा…. राजकुमार

‘जिनका घर शिशों का होता है, वो दुसरों पर पत्थर फेंका नही करतें’ अशा दमदार डायलॉगबाजीने प्रेक्षकांच्या टाळय़ा घेणाऱ्या राजकुमार यांचा जन्म ८ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला.

राजकुमार उर्फ भूषण पंडित यांची ओळख विशिष्ट शैलीतील संवादफेक गोष्टींसाठी म्हणून अधोरेखित झाली. बी. आर. फिल्म निर्मित व यश चोप्रा दिग्दर्शित ‘वक्त’ या मल्टिस्टार कास्ट चित्रपटातील त्यांनी रहेमान यांना उद्देशून केलेला संवाद त्या काळात प्रचंड गाजला व असे संवाद म्हणजेच आपली अभिनयशैली असे ते मानू लागले. तो संवाद होता, ‘चिनॉय शेठ…. शिशे के घर में रहनेवाले लोग दुसरों के उपर पत्थर नही फेंका करते.. यह चाकू कोई बच्चे के खेलने की चीज नही, हाथ कट जाएगा तो खून निकल आयेगा..’ या संवादाला रसिकांच्या प्रचंड टाळय़ा पडल्या व या यशानंतर राजकुमार यांनी अभिनयापेक्षा संवादफेकीवर जरा जास्तच लक्ष केंद्रित केले. कधी ते प्रभावीदेखील ठरले.

‘पाकिजा’मध्ये राजकुमार मीनाकुमारी यांना एकदा म्हणतात, ‘यह पाँव जमीं पे मत रख देना, मैले हो जायेंगे..’ पण ‘एका विशिष्ट लयीतील संवाद’ अशी त्याची ओळख व ताकददेखील झाल्याने दिग्दर्शक त्याला स्वातंत्र्य देत असत असे जाणवू लागले. आणि याच गुणावर ‘फिदा’ असणारा असा त्याचा स्वत:चा एक मोठा चाहतावर्गही निर्माण झाला. तो राजकुमारचे संवाद ऐकायला सिनेमाचे तिकीट काढू लागला. त्याच्या संवादावर मनसोक्त टाळय़ा मारू लागला.

गिरगावातील इम्पिरियल या चित्रपटगृहाच्या भिंतीवर त्याचे ‘बुलंदी’चे संवाद लिहिले होते, ते वाचून तिकीट काढणारे फिल्म दीवाने होते. हेदेखील यशच!

मेहबूब खान यांचा ‘मदर इंडिया,’ श्रीधरचा ‘दिल एक मंदिर,’ चेतन आनंदचा ‘हीर रांझा’ या चित्रपटांत राजकुमार यांचा उत्तम अभिनय पाहायला मिळतो. दिल अपना और प्रीत परायी’ हा राजकुमार यांचा एक महत्त्वपूर्ण चित्रपट. एका डॉक्टरच्या भूमिकेत, नर्स असलेल्या मीनाकुमारी यांच्याबरोबर, त्यांची अभिनयाची जुगलबंदी प्रेक्षक विसरू शकत नाहीत.

‘जेमिनी पिक्चर्सच्या एस.एस. वासन दिग्दर्शित ‘पैगाम’ नंतर मुक्ता आर्ट्सच्या सुभाष घई दिग्दर्शित ‘सौदागर’ मध्ये ते तब्बल एकतीस वर्षांनी दिलीपकुमारसमोर उभा ठाकले. कारकिर्दीच्या सुरुवातीला दिलीप-देव-राज या त्रिमूर्तीच्या वाटचालीतही या जानीने उभे राहण्यात यश मिळवले व नंतर मनोजकुमार सुनील दत्त-धर्मेद्र-जीतेंद्र-राजेश खन्ना यांच्यासमोरही ते वाटचाल करू शकला. अर्थात, त्याचे वळण, त्याचा रस्ता पूर्णपणे वेगळा होता.

राजकुमार हे वेगळे रसायन होते हे त्यात त्यांनी सतत सिद्ध केले, अगदी त्याच्या मृत्यूची बातमीदेखील त्याच्या त्या वाटचालीला साजेशी ठरली. त्यांना कर्करोगाने ग्रासले असल्याची बराच काळ चर्चा असूनही त्या दरम्यान त्यांनी ‘सौदागर’मधील भूमिका साकारली होती, पुढेही काही काळ वाटचाल केली, राजकुमार हा राजकुमारसारखा जगला व स्वत: निर्माण केलेल्या अनाकलनीय अशा प्रतिमेनुसारच जगाच्या पडद्यावरून गेला.

राजकुमार यांचे काही महत्त्वाचे व उल्लेखनीय चित्रपट – ‘अर्धागिनी’ (१९५९) (मीनाकुमारी), ‘नीलकमल’ (१९६८) (वहिदा रहेमान), ‘जिंदगी’ (१९६४) (वैजयंतीमाला), ‘हमराज’ (१९६८) (सुनील दत्त), ‘मेरे हुजूर’ (१९६८) (माला सिन्हाबरोबर)

राजकुमार यांचे ३ जुलै १९९६ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:- इंटरनेट/लोकसत्तामहासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

marathi-barakhadi-chaudakhadi

मराठी बाराखडी आता चौदाखडी

मराठी बाराखडीची ओळख तर आपल्या सर्वांना शाळेपासूनच होते. मात्र आता ...
p-475-ThermalPowerstationBhusawal

भुसावळ

भुसावळ हा जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठा तालुका असून या शहरात ...
p-558-ichalkaranji-rajwada

महाराष्ट्राचे मॅन्चेस्टर इचलकरंजी

कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी हे शहर वस्त्रोद्योगामधील पूर्वेकडील मँचेस्टर म्हणून ओळखले ...
paithani-sarees-2-300

पैठण – दक्षिण काशी

औरंगाबादपासून ५० कि.मी अंतरावर गोदावरी नदीच्या किनार्‍यावर वसलेल्या पैठण या ...

Loading…

संजीव वेलणकर
संजीव वेलणकर यांच्याविषयी... 1299 लेख
श्री संजीव वेलणकर हे पुणे येथील कॅटरिंग व्यावसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती या विषयांवर ते नियमितपणे लेखन करत असतात.
संपर्कः फेसबुक

पहिला अभिप्राय नोंदवा

अभिप्राय नोंदवा

Your email address will not be published.


*